आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योग उभारल्यानंतरही‎‎ जमिनीचा वापर नाही‎:नांदगाव एमआयडीसीतील कंपन्यांची जमीन पडून‎

अमरावती‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव पेठ एमआयडीसीतील‎ कंपन्यांची वापरात नसलेली‎ शेकडो चौरस फूट जमीन तशीच‎ पडून आहे. उद्योग उभारल्या‎ नंतरही कंपन्यांद्वारे उर्वरित‎ जमिनीचा वापर केला जात नसून‎ ही जमीन जर शासनाने परत‎ घेतली तर त्यावर नवीन उद्योग‎ स्थापन करता येणे शक्य आहे.‎ या कंपन्यांना महाराष्ट्र‎ औद्योगिक विकास महामंडळाने‎ करारराम्यानुसार शेतकऱ्यांच्या‎ जमिनी उपलब्ध करून दिल्या‎ आहेत. परंतु, ज्यांच्याकडे जमिनी‎ उद्योग उभारल्यानंतही शिल्लक‎ आहेत त्यांनी अन्य कोणत्याही‎ उद्योगांना चालना दिली नाही.‎ शेतकऱ्यांच्या मुलांनाही दिली‎ नाही.

त्यामुळेरिकामी असलेली जागा शासनाने‎ परत घ्यावी व त्या जागेवर नवीन‎ उद्योगाला जागा मंजूर करुन द्यावी,‎ अशी मागणी स्वाभिमानी कामगार‎ युनियनद्वारे नुकतीच राज्याचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट‎ घेऊन करण्यात आली. याप्रसंगी‎ बडनेऱ्याचे आमदार रवी राणा ,‎ स्वाभिमानी कामगार युनियनचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शहर अध्यक्ष नीलेश भेंडे, अनुप‎ खडसे, पराग चिमोटे ,अंकुश‎ मेश्राम, श्रीकांत इंगळे ,चंदन‎ जाधव उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...