आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचा बडगा:अनधिकृत होर्डिंगचा ‘बाजार’ उठणार ; होर्डिंग काढण्याचा मनपाने घेतला निर्णय

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्जचा ‘बाजार’ लवकरच उठणार आहे. नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेले हे होर्डिंग्ज पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक ठरू शकतात. मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ते बघता मनपाने प्रथमच इमारतींसह नागरिकांसाठीही धोकादायक ठरणारे शहरातील ९५ अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर होर्डिंग लावणाऱ्यांकडून जाहिरात कर वसूल करणेही शक्य होणार आहे.

मुसळधार पावसामुळे इमारतींना तडे जाण्याचे प्रकार घडतात. तसेच वादळी वाऱ्यांमुळे होर्डिंग कोसळून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच मनपाने सर्वप्रथम अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमबाह्य होर्डिंग्जमुळे मनपाला सध्या वर्षभरात किमान १ कोटी रुपयांचा फटका बसत आहे. जर नियमबाह्य होर्डिंगसह जाहिरातीच्या फलकांवर कारवाई सुरू झाली, तर मनपाचे निश्चितपणे उत्पन्न वाढेल. तसेच जाहिरात करही नियमानुसार वसूल करता येईल.

नियमबाह्य होर्डिंग्ज काढण्यासाठी मनपाद्वारे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. कारण हे अवजड होर्डिंग काढण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता असते. मनपाकडे ते नाही. निवडणूक होण्याआधी जर ही मोहीम सुरू झाली, तर त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेपही राहणार नाही. विनाअडथळा शहराचे सौंदर्य नष्ट करणारे फलक, होर्डिंग्ज जमीनदोस्त करता येणार आहेत. येत्या काही दिवसांत मनपा शहरातील इमारती, मुख्य चौक अनधिकृत होर्डिंग्ज व जाहिरात फलकांपासून मुक्त करण्याची मोहीम सुरू करणार आहे. कारण कोणीही न विचारता कुठेही फलक उभारण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा तर महापुरुषांचे पुतळे, दिशादर्शक फलकांसह संदेश देणारे फलकही झाकले जातात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. प्रत्येक जाहिरात फलक धारकांकडून शुल्क घेऊन त्यावर मनपाचा लोगो लावल्यास ते अधिकृत समजले जाईल. मात्र ज्यावर मनपाचा लोगो नसेल ते जाहिरात फलक व होर्डिंग हे अनधिकृत असेल. यामुळे गैरप्रकाराला आळा बसून मनपाचे उत्पन्नही वाढेल.

बातम्या आणखी आहेत...