आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील खेर्डां खुर्द गावातील एका शेतकरी पित्याने आपल्या मुलीची वरात घोड्यावरून काढली. मुलगी मुलापेक्षा कमी नाही. ती एक नाहीतर दोन घर प्रकाशमान करते. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीला धुमधड्याक्यात निरोप देण्यासह, समाजाला स्त्री-पुरूष समानतेचा संदेश या कुटूंबाने दिला आहे. खेर्डा खुर्द येतील शेतकरी गोवर्धन तान्हुजी सदाशीव व त्याच्या पत्नी कल्पना सदाशीव यांनी मुलीच्या जन्माच्या वेळीच तिच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्ने बघितली होती. दोन भावंडात गोवर्धन यांची मुलगी सपना मोठी झाली. तिने उच्चशिक्षण पूर्ण केले.
काही दिवसांपूर्वीच सपनाचे लग्न नाशिक येथे जल संसाधन मंत्रालयात नोकरीवर असलेल्या प्रशिश विजय खंडारे यांच्यासोबत जुळले. या वेळी सदाशीव कुटूंबाने आपल्या मुलीची वरात घोड्यावरून काढण्याचे ठरवले. त्यानुसार लग्नाची तयारी करण्यात आली. ५ जूनला हा विवाह सोहळा झाला. या वेळी वधू लग्नमंडपी मुलाप्रमाणे घोड्यावरून आली. घोड्यावरून जाणाऱ्या वधूची वरात बघण्यासाठी जवळपासच्या गावकऱ्यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. उच्चशिक्षण देऊन वाढवले गोवर्धन सदाशीव यांना दोन मुलं पंकज व धीरज आहे. त्यांनी मुलगी सपना हिलाही मुलांप्रमाणे उच्चशिक्षण दिले.
गोवर्धन यांची जलदूत म्हणून गावामध्ये ओळख आहे. यापूर्वी त्यांनी उन्हाळ्यामध्ये स्वत:च्या शेतातून पाइपलाइन टाकून गावाची तहान भागवली हाेती. संपूर्ण गावाला दुष्काळ परिस्थितीमध्ये पाणी पुरवले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जलदूत सन्मान प्रदान केला होता.जन्मावेळीच केला होता निश्चय मुलीचा जन्म झाला त्यावेळी तिच्या लग्नाची वरात घोड्यावरून काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ५ जून रोजी लग्न समारंभ झाला. आजच्या काळात मुली कुठल्याच क्षेत्रात कमी नाही. तिलाही सर्व प्रकारचा आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे. हाच संदेश मला समाजाला द्यायचा होता. गोवर्धन सदाशीव, वधूपिता घोड्यावरुन जाणारी वधूची वरात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.