आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांनी घेतली बैठक

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी आणि सण-उत्सव शांततेत पार पडावे, या उद्देशाने गुरूवारी (दि. २२) पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वसंत हॉल येथे बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्तांनी शारदादेवी तसेच नवदुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व संबंधीत विभागाचे प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, सहायक आयुक्त अन्न व औषधी विभाग, उप-विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता महावितरण, विभाग नियंत्रक एस.टी. महामंडळ, निरीक्षक प्रादेशिक परिवहन विभाग, मनपा अग्नीशमन विभाग, आरोग्य विभागाचे वैद्यकिय अधिकारी, क्षेत्रिय प्रदुषण अधिकारी तसेच इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवातील उत्कृष्ट देखाव्याला पारितोषिक
गणेशोत्सव दरम्यान गणेश मंडळांनी उत्कृष्ट देखावा करून पोलीसांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला, यावेळी बाल गणेश मंडळाला (साहुर, वलगांव) प्रथम, बजरंग गणेश मंडळ (पटविपुरा, खोलापुरी गेट) व्दितीय व बालदिपक गणेश मंडळ (नांदगाव पेठ) तृतीय पारितोषक पोलीस विभागाकडून देण्यात आले. तसेच, ईतर नऊ मंडळांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले असून, परिक्षण समितीचे सदस्य व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे हेल्प लाईन सदस्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...