आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफलीला रसिकांचा उदंड प्रतिसाद:द मेलोडियस जर्नी ऑफ किशोर कुमार ने गीतांची मैफल रंगली

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक, कल्चरल अँड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती द्वारा आयोजित “द मेलोडीयस जर्नी ऑफ किशोर कुमार” ही गीतांची मैफल रंगली. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे झालेल्या या मैफलीला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. जयंत वाने यांनी काढलेल्या किशोरकुमार यांच्या चित्राचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बुलडाणा अर्बन को आॅपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीचे अनंत देशपांडे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, ॲनिमेशन कॉलेजचे संचालक विजय राऊत, गुरुमूर्ती चावली, महिंद्रा जनरेटर्सच्या जनरल मॅनेजर सुचिता खुळे, सिंफनीचे संचालक सचिन गुडे व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अनंत देशपांडे आणि शिवराय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्यात.दिये जलते है, राह पर रहते आणि जीवन के दिन छोटे सही या गीतांनी अनिल घाडगे यांनी मैफलीचा आरंभ केला. मैफलीचे अभ्यासपूर्ण निवेदन नासिर खान यांनी केले. हमे तुमसे प्यार कितना आणि खिलते है गुल यहा हे दोन गीत सादर करून प्रमोद ढगे यांनी मैफलीत रंग भरला. सा रे ग म प लिटिल चॅम्प विजेती वैष्णवी भालेराव हिने आपकी नजरोने समझा हे बहारदार गीत पेश केले. तेरे मेरे मिलन की ये रैना हे युगलगीत प्रमोद ढगे आणि शीतल भट यांनी सादर केले. कोरा कागज था ये मन मेरा हे गीत घाडगे आणि भट यांनी सादर केले. आखो मे हमने आपके हे गीत घाडगे आणि वैष्णवी यांनी प्रस्तुत केले. या मैफलीचे विशेष आकर्षण अनंत देशपांडे राहिले. संगीत संयोजन आणि कीबोर्डची साथ सचिन गुडे यांनी केली. लीड गिटारची साथ मोहित चौधरी, बेस गिटारची साथ फ्रान्सिस, ऑक्टोपॅडची साथ राजेंद्र झाडे, कोंगोची साथ राजदीप चावरे, तबल्याची साथ विशाल पांडे, बासरीची साथ चेतन वानखडे यांनी केली. उद्घाटन सोहळ्याचे संचालन हरीश काळे यांनी केले. या मैफिलीतून उभा झालेला निधी विविध सामाजिक कार्यांमध्ये देण्यात येईल, असे सिंफनी ग्रुपचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी कळवले आहे.

हाल कैसा है जनाब काने मैफलीत भरली रंगत
ढगे आणि सुचिता खुळे यांनी गायलेल्या हाल कैसा है जनाब का या गीताने मैफलीत रंग भरला. सुचिता खुळे यांनी आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकली. पडोसन या चित्रपटातील एक चतुर नार हे गीत गाऊन ढगे आणि राहुल तायडे यांनी धमाल केली. घाटगे आणि वैष्णवी यांनी जाने जा धुंडता फिर रहा हू हे गीत सादर केले. ढगे आणि शीतल यांनी अश्विनी येना हे गीत प्रस्तुत केले.

बातम्या आणखी आहेत...