आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता:मनोरुग्ण तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले ; दर्यापुरातील घटना; आई घराबाहेर कपडे धुवत होती

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील दर्यापूर-मूर्तीजापूर रोड स्थित राजवाडा हॉटेलच्या मागील परिसरात एका मनोरुग्ण तरुणाने घरात अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याची आई घराबाहेर कपडे धुवत होती. अंगावर शहारे आणणारी ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आकाश गुरु प्रसाद गुप्ता (वय २६) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी आकाशाने रूमचा दरवाजा आतमधून बंद करून घेतला. त्यानंतर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. दरम्यान, कपडे धुत असलेल्या आईला घरातून आग व धूर निघत असल्याचे दिसले. आईने मदतीसाठी आरडा-ओरड केली. त्यामुळे शेजारील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत दरवाजा तोडून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आकाश पूर्णपणे जळून जागीच गतप्राण झाला होता. या घटनेची माहिती प्रहार युवा तालुकाप्रमुख विक्की होले, रुग्ण सेवक सचिन शेलारे यांना मिळताच त्यांनी धावपळ केली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून आकाशला रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी रितसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला. मृत आकाश हा मनोरुग्ण असून, याआधीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे कुटुंबीयांनी सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...