आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात वीट:मेव्हणी जावयाच्या घरी राहिल्याने सासूने मारली जावयाच्या डोक्यात वीट

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या व्यक्तीचे एका तरुणासोबत लग्न झाले मात्र, ती पतीकडे दोनच वर्षे राहिली आणि निघून गेली. त्यानंतर मेव्हणी (साळी) त्याच्या घरी राहायला आली. या प्रकारामुळे सासू जावायाकडे आली तिने जावयाकडे असलेल्या मुलीला घरी चल म्हटले, मात्र ती मुलगी त्यावेळी गेली नाही. तुमच्यामुळेच माझी मुलगी येत नाही, असे म्हणून वाद घालून सासूने जावयाच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले. हा धक्कादायक प्रकार ३ सप्टेंबरला घडला आहे. या प्रकरणी जखमी जावयाने पोलिसांत तक्रार दिली आहे.

ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या २६ वर्षीय युवकाचा काही वर्षांपूर्वी रीतिरिवाजाप्रमाणे एका युवतीशी विवाह झाला. विवाहानंतर त्याची पत्नी दोन वर्षे त्याच्याकडे राहिली, नंतर मात्र, ती पतीच्या घरुन निघून गेली. त्यानंतर या युवकाची साळी त्याच्या घरी आली व ती रहायला आली. दरम्यान, जावयाकडे मेव्हणी (साळी) राहत असल्यामुळे सासू जावयाकडे आली.

बातम्या आणखी आहेत...