आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉड मारुन खून:महिला वकिलाच्या खूनप्रकरणात पोलिसांनी सासूलाही केली अटक

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्यकंय्यापूरा परिसरात राहणाऱ्या अॅड. सविता सदांशिवे यांचा गळा दाबून तसेच डोक्यावर रॉड मारुन खून करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन अल्पवयीन नातेवाइकांसह नणंदेला अटक केली आहे. मात्र वकील महिलेला तिची सासूही त्रास देत असल्यामुळे तिलाही अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईक व परिसरातील नागरीकांनी रविवारी दुपारी फ्रेजरपुरा ठाण्यात धडक दिली. पोलिसांनी मृत वकील महिलेच्या सासूलाही अटक केली आहे.

सविता सदांशिवे यांचा घरातच ८ सप्टेंबरला खून करुन ती आत्महत्या असल्याचा बनाव आरोपींनी केला होता. मात्र पोलिसांनी आरोपींचा डाव उधळून लावत २४ तासातच खरे प्रकरण समोर आणून त्यांना अटक केली आहे. महिला वकिलाला तिची सासूही त्रास देत असल्याने सासूलाही अटक करण्याची मागणी करण्यात आली.

डायरीत लिहून ठेवले मुलींनी नातेवाइकांकडे जावे
अॅड. सविता सदांशिवे यांना तीन मुली (२ वर्षे, ८ वर्षे व ११ वर्षे) आहेत. माझ्या जीवाला काही झाले आणि सासू किंवा घरातील अन्य कोणी त्रास दिला तर मुलींनी माझ्या नातेवाइकांकडे निघून जावे, असे एका डायरीत लिहून ठेवले आहे. ही डायरीसुद्धा आज आम्ही ताब्यात घेतले असल्याचे फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...