आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आईला केली अटक, शिकण्याची इच्छा असताना लग्न लावून देण्याचा प्रयत्न

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिकण्याची इच्छा असताना लग्न लावून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या आईविरुद्ध अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून अमरावतीतील गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

एका गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न ठरवण्याच्या प्रयत्नात तिची आई हाेती. मात्र या १५ वर्षीय मुलीनेच आईच्या मनसुब्यावर पोलिसांत तक्रार देऊन पाणी फेरले आणि स्वत:चा बचाव केला. सध्या नवव्या वर्गात शिकते. वडिलांचे निधन झालेले असून तिला सहा वर्षांची बहीण व १३ वर्षांचा लहान भाऊ आहे. दरम्यान, मागील एक महिन्यापासून रहाटगाव येथे राहणारा दीपक अर्जुन सूर्यवंशी (२०) हा तिच्या आईकडे या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून देण्याची मागणी करतो आहे. यासाठी तो तिच्या आईला ५० हजार रुपये देण्यास तयार आहे. मात्र माझे वय कमी असून मला शिकायचे आहे म्हणून तिने आईला लग्नासाठी नकार दिला. त्या वेळी आईने आपल्याला समजून न घेता मारहाण केली, अशी तक्रार पोलिसांत दिली. यानंतर तिच्या आईविरुद्ध तसेच दीपक सूर्यवंशीविरुद्ध कलम १०, ११ बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. तसेच मुलीच्या आईला अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...