आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:खत्रींच्या इमारतीची शिकस्त भिंत मनपाने पाडली ; मनपा प्रशासनाची तडकाफडकी कारवाई सुरू

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभात चौकातील राजेंद्र लाॅजची इमारत व त्या इमारतीमधील राजदीप एम्पोरियमच्या डागडुजीचे काम सुरू असताना अर्धा खालचा मजला कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण ठार तर दोघे जखमी झाले. त्यानंतर मनपाने शहरातील सर्वच शिकस्त इमारतींविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला असून याअंतर्गतच मंगळवार,दि. १ रोजी चौधरी चौक ते न्यू काॅटन मार्केट मुख्य रस्त्यापासून बाॅम्बे फैलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सी.एल.खत्री यांच्या शिकस्त इमारतीची शिकस्त भिंत मनपाने जेसीबीद्वारे पाडली.

मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशानुसार तसेच झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. झोन क्रमांक २ मध्ये २५ अति धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी पहिली कारवाई खत्री यांच्या इमारतीच्या भिंतीपासून सुरू करण्यात आली.

खत्री यांना शिकस्त भिंत पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिकेतर्फे तीन नोटीस देण्यात आल्या होत्या. ही भिंत फारच शिकस्त असल्याने त्यामुळे धोका होण्याची शक्यता होती. दगड आणि विटांपासून ही जाडजूड भिंत तयार करण्यात आली होती. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता बघता मनपाच्या अतिक्रमण विभागाद्वारे ती पाडण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...