आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मनपाने प्रभात चौकात राजेंद्र लाॅजच्या इमारतीमधील उर्वरित दुकाने पाडली

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभात चौकातील राजेंद्र लाॅजच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर असलेली दोन दुकाने रविवार,दि. ३० रोजी दुरुस्ती सुरू असताना कोसळून पाच जण मृत्यूमुखी पडले होते तर दोन जण जखमी झाले होते. या इमारतीमध्ये तळमजल्यावर तीन दुकाने तशीच होती. त्यांना मनपाद्वारे तात्पुरते सील ठोकण्यात आले होते. मात्र, आणखी कोणतीही जीव किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून गुरुवार,दि. ३ रोजी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाद्वारे ही तिन्ही दुकाने व संपूर्ण इमारतच पाडण्यात आली.राजेंद्र लाॅजच्या तळमजल्यावर आसाम टी कंपनी, सोसायटी टी, शाहीन स्टेशनर्स ही तीन दुकाने होती.

तिही आज जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आता ही संपूर्ण जागाच रिक्त झाली असून या इमारतीपासून शेजारच्या इमारतीलाही धोका राहिला नाही. तळमजल्यावरील या पाचही दुकानदारांनी स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतले होते. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू असताना राजदीप एम्पोरियम व बॅग हाऊस कोसळले. मात्र, या तिन्ही दुकानांचे थाेड्याफार प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळेच पुढील अनर्थ टाळण्यासाठी तिही पाडण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.

ही कारवाई अतिक्रमण पथक प्रमुख अजय बंसेले, कार्यकारी अभियंता दोन सुहास चव्हाण, अभियंता अजय विंचूरकर, अतिक्रमण निरीक्षक श्याम चावरे, योगेश कोल्हे, अतिक्रमण विभाग कर्मचारी प्रसन्नजीत चव्हाण, नीरज तिवारी, शुभम पांडे, क.ली.समीर शाह, शहेबान, सुनील यादव, सोनोने, गजानन संगोले, सागर काळे, शेख सलीम, अब्दुल रहीम, शहबाज खान, यश सांगोले व पोलीसांच्या उपस्थितीत करण्यात आली.

कारवाई सुरूच राहणार
आता कोणताही धोका पत्करायचा नाही. शिकस्त इमारतींविरोधात धडक कारवाई केली जाईल. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. या इमारतींपासून इतर कोणालाही धोका होऊ नये. तसेच यापुढे शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, हाच यामागील उद्देश आहे. -डाॅ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, मनपा, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...