आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताचा सामना:शहरातील रस्त्यांची पालिकेने दखल घ्यावी; मनसेची मागणी

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. १० मधील मुख्य रस्त्यालगतच्या कोकाटे कॉम्प्लेक्स ते मेटकर यांच्या घरापर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी पूर्ण उखडला असून, काही ठिकाणी खड्डेमय झाला आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेने या गंभीर समस्येची दखल घेण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष लकी पाटील गावंडे व उपशहराध्यक्ष अनिकेत सुपेकर यांच्या नेतृत्वात पालिका मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्याशी चर्चा करत निवेदन देण्यात आले. कोकाटे कॉम्प्लेक्स ते मेटकर यांच्या घरापर्यंतचा रस्ता वाहतुकीचा रस्ता असून त्यावरून विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिकांची ये-जा असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता पालिका प्रशासनाने त्वरित रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना मनसेचे मयूर कडू, संदीप झळके, राम शिंदे, भूषण टेकाडे, दीपक बगाळे आदींसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...