आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत 5 दिवसांपासून बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला:घराच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत मृतदेह, मृत्यूचे गूढ कायम

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय अभियंता तरुणी अश्विनी खांडेकरचा घराच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत मृतदेह शनिवारी (दि. ३) सकाळी दिसला. दरम्यान, मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येणार आहे. मात्र अश्विनीचा मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे कुजला आहे, त्याकारणाने वैद्यकीय चमूद्वारे पोलिसांना प्राथमिक शवविच्छेदन अहवाल शनिवारी रात्रीपर्यंत देवू शकले नाही. त्यामुळे आगामी काही दिवस अश्विनीच्या मृत्यूचे कारण समोर येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पाण्याची टाकी कापून बाहेर काढला मृतदेह
अश्विनीचा मृतदेह असलेली पाण्याची टाकी एक हजार लिटर क्षमतेची आहे. त्या टाकीची उंची सुमारे पाच फूट आहे. त्यामुळे अश्विनीने त्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली किंवा कसे, याबाबत तूर्तास काहीही समोर आले नाही. अश्विनीचा मृतदेह टाकीतून बाहेर काढण्यासाठी ही टाकी कापावी लागली.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल
तरुणीचा मृतदेह वॉटर टँकमध्ये तरंगताना मिळून आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांकडून प्राथमिक अहवाल शनिवारी रात्रीपर्यंत प्राप्त झाला नाही. मृतदेह कुजल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले नाही. आसाराम चोरमले, ठाणेदार गाडगेनगर.

बातम्या आणखी आहेत...