आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • The Need To Strengthen The Fight Against The Rulers Freedom Fighters Honored By CPI, Programs At Various Places On The Occasion Of Amrit Jubilee Year

राज्यकर्त्यांविरुद्ध लढाई बळकट करण्याची गरज:भाकपतर्फे स्वातंत्र्य सेनानींचा सन्मान, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या सन्मानार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हयात विविध ठिकाणी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून मोर्शी तालुक्यातील येरला येथील तीन स्वातंत्र्य संग्राम सैनिक कॉ. पंडीतराव चौधरी, कॉ. लक्ष्मणराव धानोरकर व कॉ. किसनराव वानखडे यांच्या सन्मानार्थ सभा घेण्यात आली. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

सन्मान सभेच्या अध्यक्षस्थानी सुहास ठाकरे होते. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे, येरला ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वप्नील चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या विरोधात आपले प्राण पणाला लावणारे अनेक क्रांतिकारक आहेत. शिवाय या चळवळीत कित्येक वर्षे तुरूंगवास भोगलेले अनेक स्वातंत्र्य संग्राम सैनिकही आहेत. या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे विचार आणि मार्गदर्शन आजही प्रासंगिक असून आपण सर्वांनी त्यानुसार कृती केली पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

लढाई बळकटीकरण गरजेचे

या काळात अगदी रणांगणात जाऊन रणसंग्राम करायची गरज नाही. परंतु सरकार ज्या पद्धतीने आपल्यावर राज्य करीत आहे. त्यातील विषमतावाद समजून घेत नागरिकांचे प्रबोधन करणे व स्वकीयांविरुद्धची किंबहूना राज्यकर्त्यां विरुद्धची लढाई अधिक बळकट करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड भस्मे यांनी यावेळी केले.

यांची उपस्थिती

येथील तीनही स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे सुपुत्र ज्ञानेंद्र चौधरी, पांडूरंग धानोरकर व हरिश्चंद्र वानखडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंडितराव चौधरी यांच्या स्मृतिस्तंभाला सामुहिकपणे अभिवादन करण्यात आले. यावेळी भाकपचे जिल्हा सचिव कॉ. सुनील मेटकर, आयटकचे चंद्रकांत बानुबाकोडे, ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे निळकंठ ढोके, इतर पदाधिकारी अक्षय मंदुरकर, महादेव मानकर, हरिदास चरपे, शंकरराव मालपे, सुनील चौधरी यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा इतिहास समजावा

जिल्ह्यात कुऱ्हा, अमरावती, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर येथेही भाकपतर्फे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या सन्मानाचे कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान अमरावती येथील कार्यक्रमात अंजनगाव बारी येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक वामनराव कदम यांच्या चिरंजीवांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा इतिहास त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध असावा, अशी मागणी केली. या मागणीला अनुसरुन भाकपतर्फे जिल्हाधिकारी यांना लवकरच निवेदन दिले जाणार असल्याचे यावेळी जिल्हा सचिव कॉ. मेटकर यांनी घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...