आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:खविसंसह ‘किसान’च्या‎ नव्या संचालकांचा सत्कार‎ ; अनंत साबळे‎ यांच्या नेतृत्वात यश संपादन

अंजनगावसुर्जी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील किसान जिनिंग अॅन्ड‎ प्रेसिंग सहकारी संस्था व अंजनगाव‎ तालुका सहकारी खरेदी विक्री‎ संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या‎ निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या‎ नवनियुक्त संचालकांचा सत्कार‎ सोहळा सहकार पॅनल मंगळवारी‎ (दि. ४) शहरातील प्रभा मंगल‎ कार्यालय येथे आयोजित करण्यात‎ आला होता. या वेळी सहकार‎ पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचा‎ मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात‎ आला.‎ दोन्ही संस्थांच्या निवडणुकीमध्ये‎ सहकार पॅनल व परिवर्तन पॅनल‎ एकमेकांच्या विरोधात मैदानात होते.‎ या दोन्ही निवडणुकीच्या रणांगणात‎ सहकार पॅनलचे प्रमुख अनंत साबळे‎ यांच्या नेतृत्वात निर्वात सहकार‎ पॅनलने यश संपादन करीत वर्चस्व‎ मिळाले आहे.

या निवडणुकीमध्ये‎ विजयी झालेल्या सहकार पॅनलच्या‎ सर्व नवनियुक्त संचालकांचा सत्कार‎ केला. या प्रसंगी दर्यापूर विधान सभा‎ मतदारसंघाचे आमदार बळवंत‎ वानखडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे‎ अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा‎ मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर‎ भारसाकळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे‎ संचालक माजी आमदार वीरेंद्र‎ जगताप, विदर्भ वैभव मंदिर मुंबईचे‎ अध्यक्ष अशोक बारब्दे, श्री अंबादेवी‎ सहकारी साखर कारखान्याचे माजी‎ अध्यक्ष हरिभाऊ बहिरे, दर्यापूर‎ येथील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष‎ अभिजित देवके उपस्थित होते.‎