आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयितांची तपासणी:जिल्ह्यात कोरोनाची‎ रुग्ण संख्या शून्य‎

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सोमवारी‎ ७८ संशयितांची तपासणी‎ केल्यानंतर एकही नवा कोरोना रुग्ण‎ आढळून आला नाही. काही‎ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना‎ शून्यावर येत असतांना मध्यंतरी‎ पुन्हा एक रुग्ण आढळून आला‎ होता. त्यांनतर आजवर नवीन रुग्ण‎ आढळून आला नाही. जिल्हा शल्य‎ चिकित्सक यांच्या कार्यालयाने‎ दिलेल्या माहितीनुसार सध्या‎ जिल्ह्यात कोरोनाचा एकही सक्रीय‎ रुग्ण नाही. जिल्ह्यातील एकूण‎ कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७‎ हजार १२९ असून एकूण बरे‎ झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५‎ हजार ५०१ आहे. जिल्ह्यात‎ आतापर्यंत १ हजार ५९६ रुग्णांचा‎ मृत्य झाला आहे. तसेच इतर‎ जिल्ह्यातील उपचारासाठी दाखल‎ झालेल्या ३२ रुग्णांचाही कोरोनामुळे‎ बळी गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...