आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारूप आराखडा:अमरावती मनपातील सदस्यसंख्या आता 87 होण्याची शक्यता; आदेशाची प्रतीक्षा

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी महानगर पालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास मंत्रालयाने दिले आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी तत्काळ कारवाई सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ते बघता जुनी प्रभाग रचना रद्द झाली असून विविध राजकीय पक्ष आतापासूनच कामाला लागले आहेत. मात्र प्रभाग रचना तीन की चार सदस्यांची राहणार याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झाले नसल्याने मनपा प्रशासन निवडणूक आयोगाच्या आदेशाचे प्रतीक्षा करीत आहे. जानेवारी महिन्यात निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊ शकते, अशी मनपा वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात लोकसंख्या वाढीच्या आधारावर प्रभाग आणि वार्डांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार अमरावती मनपा ९८ सदस्यांची झाली होती. तसेच प्रभागांची संख्याही तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार ३३ (एक प्रभाग दोन सदस्यांचा होता) पर्यंत वाढली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीचा निर्णय रद्द करून त्यांनी आधीच्याच प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचे निर्देश दिले.

मुंबई मनपा प्रभाग निर्णय सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वीच राज्य शासनाने मनपाला प्रभागांची संख्या, स्वरूप तसेच सदस्यांची संख्या निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता नगरसेवकांची संख्या ८७ होण्याची शक्यता आहे.

नव्या प्रभाग रचनेसाठी कोणतीही अडचण नाही
नव्या प्रभाग रचनेसाठी मनपा प्रशासनाने आधीपासूनच सज्जता करून ठेवली आहे. त्यामुळे आम्ही तत्काळ कामाला लागू शकतो. कोणतीही अडचण नाही.-डाॅ. प्रवीण आष्टीकर, प्रशासक, मनपा.

बातम्या आणखी आहेत...