आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा अधिकारी आयुक्तांचे फोनही उचलत नसल्याने अखेर आयुक्तांना तंबी देणारे परिपत्रक काढावे लागले आहे. जर आयुक्तांचेच फोन अधिकारी उचलत नसतील तर सर्वसामान्यांची काय बिशाद, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
नुकतीच शहरात एक मोठी आगीची घटना घडली. त्यात जीवित हानी झाली नाही. परंतु, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती काही सुज्ञ नागरिकांनी फोनवरून मनपा आयुक्तांना दिली. त्यांनी काही बडया अधिकाऱ्यांसह अग्नीशमन विभागालाही फोन लावला. त्या दिवशी सार्वचनिक सुटी जरी असली तरी आयुक्तांचा फोन उचलणे अपेक्षित होते. परंतु, तसे घडले नाही.
या घटनेपासून धडा घेत आयुक्तांनी महत्त्वपूर्ण लोकांचे फोन हे कोणत्याही दिवशी उचलावे, असे परिपत्रक काढले आहे. हा मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा भाग आहे. ज्यावेळी मनपा आयुक्त म्हणून डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी पदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी मला अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त हवी. बेशिस्तपणे खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र अधिकारी असे वागत असल्याचे चित्र आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.