आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:राजापेठ भागातील शिकस्त इमारत मनपा प्रशासनाकडून जमीनदोस्त

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभात चौकातील राजेंद्र लाॅजची इमारत रविवार ३० रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू तर २ जण जखमी झाले. त्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून कालपासूनच त्यांनी शिकस्त इमारती, बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. झोन क्र. २ मध्ये सर्वाधिक २५ शिकस्त इमारती असून, बुधवार,दि. २ रोजी राजा पेठ ते शंकरनगर मार्गावरील डाॅ. पांढरीकर यांच्या दवाखान्याजवळ असलेल्या शिकस्त इमारतीवर मनपाने गजराज चालवला.

यावेळी येथे मोठ्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली होती. भविष्यात शहरात प्रभात चौकातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या उद्देशाने मनपा प्रशासनाने सध्या कठोर भूमिका घेतली असून याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी बाॅम्बे फैल मार्गावरील खत्री यांच्या इमारतीची शिकस्त भिंत जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीला पाडण्यासाठीही मनपाद्वारे तीनपेक्षा जास्त नोटीस बजावण्यात आल्या होत्या. परंतु, त्यानंतरही ती इमारत मालकाने पाडली नाही. ते बघता अखेर मनपानेच पुढाकार घेत ती जमीनदोस्त केली.

तीन पथकांची निर्मिती शहरातील ७० वर्षांपेक्षा जुन्या शिकस्त इमारती त्या नेमक्या कोणत्या गटात मोडतात त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. सी-१ अर्थात अतिशय धोकादायक श्रेणीतील इमारतींना प्राधान्याने भुईसपाट केले जाणार आहे. यासाठी मनपाद्वारे तीन पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबरपासून हे पथकं आणखी वेगाने काम सुरू करणार आहेत.

केवळ इशारा, नोटीस देऊन भागणार नाही
आता केवळ इशारा, नोटीस, पाणी तसेच नळाचे कनेक्शन कापून चालणार नाही, याची जाणीव मनपा प्रशासनाला झाली आहे. कारण आजवर एवढ्यावरच भागत होते. इमारत मालक व भाडेकरू काहीच होत नाही, अशी समजूत करीत आहे, त्याच ठिकाणी राहात होते. परंतु, यापुढे असे चालणार नाही मनपा प्रशासन सजग झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...