आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:नवीन 300 पेक्षा अधिक शिधापत्रिकांना आरसी क्रमांक मिळण्याची प्रक्रिया सुरू; गरजू लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका प्राधान्य गटात समाविष्ट करण्याची कार्यवाही

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती शहरी भागात सरकारी स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेच्या कामकाजात पारदर्शकतेसह वेग आणण्यासाठी व अनेक शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आ. सुलभा खोडके यांनी अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय शहरी विभाग संबंधीच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यामुळे नवीन ३०० पेक्षा जास्त शिधापत्रिकांना आरसी क्रमांक मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरी भागातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी तसेच केशरी शिधा पत्रिकाधारकांची एकूण संख्या व त्यांना मिळणारे सरकारी धान्य, नवीन शिधापत्रिकांबद्दल कार्यवाही, याबाबत आ. खोडके यांनी माहिती घेतली. काही नवीन शिधापत्रिकांना अद्यापही (आरसी क्रमांक) रेशनकार्ड क्रमांक देणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश आमदारांनी दिले.

अमरावती शहरांतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे २२,९७९ शिल्लक असलेले उद्दिष्ट विचारात घेऊन ज्या शिधापत्रिका एनपीएच वर्गवारीत समाविष्ट केलेल्या आहेत, त्यांची छाननी करून गरजू लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही तातडीने करावी. तसेच शहरातील एकूण कार्यरत असलेल्या १६२ रास्त भाव दुकानाच्या पुनर्रचनेसंदर्भात तातडीने कारवाई करायची आहे. डेटा एन्ट्री संदर्भात कार्डधारकांकडून मागील ३ ते ४ महिन्यांपासून कार्यालयात दाखल केलेले अर्ज प्रलंबित असल्याने कार्डधारक हे त्यांना मिळणाऱ्या धान्यापासून वंचित असल्याने प्रलंबित डेटा एंट्रीचे काम तात्काळ पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली. बायोमॅट्रिक मशीनमधील तांत्रिक त्रूट्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोफत धान्य व स्वस्त धान्य मागे पुढे वाटप होत असून , या महिन्याचे पुढच्या महिन्यात असे प्रकार निदर्शनास आले आहे. यावर संबंधित दुकानदारांना नोटीस बजावण्यात यावी. ज्या प्रकरणात अर्ज मंजूर करून शिधापत्रिका तयार करण्यात आली आहे, त्यांना आरसी क्रमांक देण्याची प्रक्रिया गतीने राबवली जाईल. तसेच त्रुटी असलेला अर्ज तात्काळ संबंधित सेतुसंचालकांकडे परत पाठविण्यात येईल, अशी माहिती अन्न व पुरवठा अधिकारी गोपाल कडू यांनी बैठकीत दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता व विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे , पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा अन्न धान्य वितरण अधिकारी गोपाल कडू, पुरवठा निरीक्षक निखिल नलवडे, साधना राऊत, जयश्री बाजड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, अविनाश मार्डीकर, योगेश सवई, अशोक हजारे, यश खोडके, जितेंद्रसिंग ठाकूर, मनोज केवले, सुयोग तायडे, बंडू धोटे, विजय बाभुळकर, किशोर भुयार, नीलेश शर्मा, संजय मळणकर, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, प्रशांत धर्माळे, आनंद मिश्रा, प्रशांत महल्ले, शक्ती तिडके, राजू सांगोले यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...