आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • The Project Victims Erected Black Gudi With Black Bandages On Their Foreheads, The Oppression Of The Administration; Allegations Of Project Victims

प्रतिकात्मक उपोषण:प्रकल्पग्रस्तांनी कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून उभारली काळी गुढी, प्रशासनाची दडपशाही; प्रकल्पग्रस्तांचा आरोप

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्तांचे गेल्या ३० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणावर बसले आहे. मात्र, शासन आणि प्रशासन बुजगावण्यासारख उभे असल्याचे संतप्त प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्तांच्या आहे. गुढीपाडवा हा हिंदूंचा पवित्र सण असून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो. परंतु शनिवारी प्रकल्पग्रस्तांनी उपोषण स्थळी शासनाविरोधात रोष व्यक्त करीत काळी गुढी उभारून निषेध केला. तसेच कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून प्रशासन आणि शासनाच्या विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. येणाऱ्या काळात सर्व सण उपोषण स्थळीच साजरे करू, असा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी दिला.

सन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेदीदार शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देणे, महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेणे व शक्य नसल्यास एकरकमी वीस लाख रूपये द्यावेत, पुनर्वसन कायदा २०३ नुसार सर्व लाभ मिळावेत, प्रकल्पांतर्गत स्थानिक प्रलंबित समस्या निकाली काढाव्यात. अप्पर वर्धा, बेंबळा व इतर सर्व प्रकल्पांतर्गत भूसंपादनात झालेली चूक दुरुस्ती करून फरकाची रक्कम व्याजासह देण्यात यावी.

प्रकल्पग्रस्तांना लाभ क्षेत्रात जमीन देण्यात यावी आदी प्रलंबित मागण्या संदर्भात ४ मार्चपासून विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने प्रकल्पग्रस्तांनी प्राणांतिक महाउपोषण जिल्हाधिकारी कार्यालय परिसराबाहेर सुरु केले. १३ दिवसानंतर १६ मार्चला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली परंतु, सरकारच्या वतीने सदर विषयावर संपूर्ण अभ्यास करण्यासाठी एक ते दिड महिन्याचा वेळ मागितला आहे. तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली होती.

परंतु सरकारवर विश्वास ठेवणे प्रकल्पग्रस्तांना कठीण जात असल्याचे प्रकल्पग्रस्त मनोज चव्हाण यांचे म्हणणे आहे. पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी देखील न्याय मिळवून देण्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांचा मान ठेवत तात्पुरत्या स्वरूपात प्राणांतिक महाउपोषण मागे घेऊन प्रकल्पग्रस्तांचे साखळी उपोषण सुरु केल्याचे मनोज चव्हाण यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांनी पहिल्यांदा होळी सण हा काळी होळी पेटवून अमरावतीच्या रस्त्यावर आंदोलन मंडपी साजरा केला. तसेच महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते.

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. मात्र, प्रकल्पग्रस्तांचा गुढी पाडवा हा उपोषण मंडपी साजरा करावा लागला असल्याचे प्रकल्पग्रस्त म्हणाले. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी काळी गुढी उभारून शासनाचा निषेध केला. सोबतच घोषणाबाजी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...