आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळाबाहा विद्यार्थ्यांच्या शोधमोहिमेत अनेक बदल करावे लागले आहेत. दरवर्षी केवळ शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत होता. यावर्षी अनियमित तसेच स्थलांतरीत शाळाबाह्य विद्यार्थ्याचे पुनर्सवेक्षण हाती घेण्यात आले. याअंतर्गत शहर व ग्रामीण भागांत विविध ठिकाणी शिक्षक, बाल रक्षक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२२ या कालावधीत १३९ बालके स्थलांतरित होऊन जिल्ह्यात आल्याचे समोर आले; तर ४१६ बालके स्थलांतरित होऊन जिल्ह्याबाहेर गेल्याचे समोर आले आहे.
या बालकांना परिसरातील शाळेत प्रवेशित केले आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने सर्व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. कोरोना कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झालेले असून ६ ते १८ वयोगटातील बालके शाळाबाह्य झाल्याची बाब समोर आली. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात बालकांना परिसरातील शाळेत प्रवेशित आणण्यासाठी मोहीम घेण्यात आली. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत राबवण्यात आलेल्या मोहिमेत स्थलांतरित होऊन आलेल्या बालकांची संख्या ही १३९ आहे तर स्थलांतरीत होऊन गेलेल्या बालकांची संख्या ४१६ आहे. स्थलांतरित होऊन आलेले तालुकानिहाय मध्ये अचलपूर ०५, अंजनगाव ०६, चांदूर बाजार २०, चांदूर रेल्वे ०५, दर्यापूर ०४, भातकुली ०२, धामणगाव ०२, धारणी ०८, मोर्शी निरंक, नांदगाव खंडेश्वर ०५, अमरावती ४९, तिवसा ०८, वरुडा ०५, चिखलदरा निरंक, मनपा १८ असे एकूण १३९ बालकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातून स्थलांतरीत तालुकानिहाय विद्यार्थी : अचलपूर २३, अंजनगाव सुर्जी ३९, चांदूर बाजार ३५, चांदूर रेल्वे ८१, दर्यापूर ००, भातकुली ०३, धामणगाव ०९, धारणी ४९, मोर्शी ०३, नांदगाव ०२, अमरावती निरंक, तिवसा २०, वरुड ००, चिखलदरा १६१, मनपा ००
जिल्ह्यातून स्थलांतरीत तालुकानिहाय विद्यार्थी : अचलपूर २३, अंजनगाव सुर्जी ३९, चांदूर बाजार ३५, चांदूर रेल्वे ८१, दर्यापूर ००, भातकुली ०३, धामणगाव ०९, धारणी ४९, मोर्शी ०३, नांदगाव ०२, अमरावती निरंक, तिवसा २०, वरुड ००, चिखलदरा १६१, मनपा ००
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.