आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन घोटाळा:मल्टी युटिलिटी रेस्क्यू वाहन घोटाळा प्रकरणाचा अहवाल मनपात पोहोचला

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खळबळ उडवून देणाऱ्या मल्टी युटिलिटी रेस्क्यू वाहन प्रकरणी चौकशी अहवाल निवृत्त उपसचिवांनी मनपा आयुक्तांकडे पाठवला आहे. हा अहवाल बघितल्यानंतर मनपा प्रशासनाद्वारे कारवाईची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाद्वारे १७ डिसेंबर २०१८ मध्ये २ कोटी ३० लाख रुपयांचे मल्टी युटिलिटी रेस्क्यू वाहन खरेदी करण्यात आले. त्यानंतर तत्काळ १९ डिसेंबरला रोख रक्कम विक्री करणाऱ्या कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आली. एकाच वेळी केवळ एका दिवसांत एवढी मोठी रक्कम रोख स्वरूपात दिल्यामुळे मनपा वर्तुळात याची जोरदार चर्चा हाेती.

एका सामाजिक कार्यकर्त्याने वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची तक्रार तत्कालीन मनपा आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर आम सभेतही मोठ्या प्रमाणात हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी तत्कालीन मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. एम. जी. कुबडे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठित केली होती. या समितीने मल्टी युटिलिटी रेस्क्यू वाहन घोटाळ्याची सखोल चौकशी केली. ज्या किमतीत हे वाहन खरेदी केले त्या किमतीत तीन वाहने खरेदी करता आली असती. तसेच वाहनांत ज्या अॅसेसरिज लावल्या त्यांची किंमतही जास्त आकारण्यात आल्याचे चौकशीत समाेर आले. त्यानंतर तीन मनपा अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्तावही आमसभेत पारित केला होता.

निवृत्त उपसचिव बी. सी. तायडे यांनी या घोटाळा प्रकरणात गेली दोन वर्षे विभागीय चौकशी केली. त्यानंतर मनपा प्रशासक डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे चौकशी अहवाल सोपावला. आता प्रशासक या प्रकरणी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...