आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सामूहिक श्रमदानातून दुरुस्त केला रस्ता ; जय अंबा गार्डन सिटीचा उपक्रम, दोनशे नागरिकांचा सहभाग

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांपासून तर वयस्कर नागरिक, महिला-पुरूष अशा विविध कुटुंबातील तब्बल दोनशेहून अधिक सदस्यांनी पुढाकार घेत सामूहिक श्रमदान केले. या श्रमदानातून रिंग रोड ते गार्डन सिटी असा जवळपास ३०० मीटरचा पावसामुळे उखडलेला रस्ता ३ ते ४ तासात दुरूस्त केला.नवसारी रिंग रोडपासून ते नवसारी गावात जाणाऱ्या रस्त्यावर ‘जय अंबा गार्डन सिटी’ सोसायटी आहे. या सोसायटीत २२८ कुटुंबे वास्तव्याला आहेत. परंतू रहदारी व सतत सुरू असलेल्या पावसामुळे हा संपूर्ण रस्ता उखडला होता. त्यामुळे गेल्या महिनाभरात या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले. दरम्यान महापालिका रस्ता दुरुस्ती कामात या रस्त्याचे काम मंजूर असले, तरी रस्त्याची दुरावस्था बघता सोसायटीच्या सर्वांनी एकमताने पुढाकार घेत सामूहिक श्रमदानातून तात्पुरता रस्ता दुरुस्ती करण्याचे ठरविण्यात आले आणि त्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करुन हा रस्ता दुरुस्त केला. श्रमदानासाठी प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते. या सामूहिक श्रमदानातून सामूहिक एकोप्याची जाणीवही प्रत्येकाला बघायला मिळाली.

सोसायटीचे अध्यक्ष निलेश ठाकरे यांनी रस्ता दुरूस्तीसाठी चुरी व खडकाची व्यवस्था करून देत स्वत:ही श्रमदान केले. त्यांच्याशिवाय अशोक इंगळे, अतुल राऊत, सुधीर देशमुख, किशोर तायडे, सचिन घोम, रमेश ठोसर, अंकुश गीरी, राजेश राऊत, नरेंद्र बोंडे, विवेक काळे, मयुरा माथनकर, अर्चना उभाड, अंकिता भाटी, मनिषा पाबळे, वैशाली भैसे, भावना देशमुख, समृध्दी राठोड, सोनाली तायडे, वैशाली राऊत, रचना इंगळे यांच्यासह सोसायटीतील सर्व महिला व पुरूषांनी सामूहिक श्रमदानात सहभाग नोंदविला.

बातम्या आणखी आहेत...