आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील देवरणकरनगरमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात प्लॅस्टीकची बंदूक घेवून गेला. त्या आधारे वृद्ध दाम्पत्याला लूटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी रक्कम दिली नाही तर चाकूने वृद्धाला जखमी करुन त्यांच्याकडून अकराशे रुपयांची रोख पळवली होती. या लुटारुला राजापेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने शनिवारी (दि. ८) रात्री पकडले आहे. विवेक विनायक राऊत (४८, रा. आष्टा, धामणगाव रेल्वे) असे पोलिसांनी अटक केलेल्या लूटारुचे नाव आहे. विवेक राऊत हा २८ जानेवारी २०२३ रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास देवरणकर नगरमध्ये राहणाऱ्या विजय देवगावकर यांच्या घरात घुसला होता.
यावेळी त्याने हातात प्लास्टिकची बंदूकसुद्धा नेली होती. या बंदूकीद्वारे त्याने देवगावकर दाम्पत्याला धमकाविण्याचा प्रयत्न केला मात्र ते घाबरले नाही. त्याने देवगावकर दाम्पत्याला तब्बल तीन लाख रुपये मागितले होते. त्यानंतर विवेकने त्यांना चाकू दाखवला, यावेळी देवगावकर यांनी प्रतिकार केला असता त्यांना लुटारुने चाकू मारला व ११०० रुपये घेऊन पोबारा केला होता. दरम्यान, या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करुन राजापेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही कारवाई राजापेठचे ठाणेदार मनिष ठाकरे, पीएसआय गजानन काठेवाडे, छोटेलाल यादव, सागर सरदार, नीलेश गुल्हाणे, दिनेश भिसे, नरेश मोहरील, विकास गुळधे यांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.