आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन चर्चासत्र:आनंदी राहण्यासाठी संगीताची भूमिका महत्त्वाची; हर्षवर्धन देशमुख यांचे प्रतिपादन;‘शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील विधा व त्यांची वर्तमान स्थिती’वर मंथन

दर्यापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवनात अनेक ताणतणाव आहेत. तणावापासून प्रत्येकाला मुक्ती हवी असते. मानवी जीवनात तणावमुक्त आणि आनंदी राहण्यासाठी संगीताची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. शहरातील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील संगीत विभागांतर्गत ‘शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील विधा व त्यांची वर्तमान स्थिती’ या विषयावर एक दिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून संगीताचे महत्त्व विशद करताना ते बोलत होते.

हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनदयाल ठाकरे व संगीत विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र शेजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या चर्चासत्राचे आयोजन संगीत विभागाच्या डॉ. वृषाली देशमुख यांनी केले होते.

या चर्चासत्राच्या उद्घाटनाला संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख अध्यक्षस्थानी होते. या वेळी उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. मीनल ठाकरे लाभल्या होत्या. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून अमरावती उच्च शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक डॉ. भोजराज चौधरी लाभले होते. त्यांनी संगीताच्या वर्तमान स्थितीवर सखोल मत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय संगीत विभाग प्रमुख डॉ.सुरेंद्र शेजे यांनी दिला. राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन डॉ. नेत्रा तेल्हारकर, तर आभार प्रदर्शन डॉ. मृणाल कडू यांनी केले.

चर्चासत्राच्या प्रथम सत्राला अध्यक्षीय स्थान डॉ. कौमोदिनी बर्डे यांनी स्वीकारले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमिला मोदी यांनी पाश्चात्य संस्कृतीत संगीताचे महत्त्व व्यक्त केले. प्रमुख वक्ता म्हणून डॉ. पंकज माला शर्मा यांनी अतिशय सुंदर पद्धतीने वेदकालीन शास्त्रीय संगीत व ध्रुपद गायन शैलीवर त्याचा प्रभाव या विषयावर वक्तव्य केले.

प्रथम सत्राचे सूत्रसंचालन डॉ. वृषाली देशमुख, तर आभार प्रदर्शन प्रा. वैशाली चौरपगार यांनी केले. द्वितीय सत्राला अध्यक्ष म्हणून अकोला येथील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संगीत विभागप्रमुख डॉ. किशोर देशमुख होते. प्रमुख वक्ता डॉ. अनिल बेव्हार होते. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. राजेश उमाळे, तर आभार डॉ. सुरेंद्र शेजे यांनी केले. चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. अर्चना अंबोरे, तर प्रमुख पाहुणे डॉ. स्नेहाशिष दास लाभले होते. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली चौरपगार, तर आभार डॉ. वृषाली देशमुख यांनी मानले. वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. हिमांशू जयस्वाल व डॉ. अंकित काळे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. चर्चासत्रांमध्ये राज्यासह परप्रांतातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीदेखील ऑनलाइन उपस्थित लावली होती. त्यांनीसुद्धा या चर्चासत्रात सहभागी वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

बातम्या आणखी आहेत...