आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा26 वर्षीय निर्दयी पतीने घरगुती क्षुल्लक कारणावरून क्रुरतेचा कळस गाठत 24 वर्षीय पत्नीच्या गळ्यावर लाथा मारून तिला ठार मारले. ही संतापजनक आणि तितकीच गंभीर घटना चांदूर बाजार तालुक्यातील टोंगलापूर येथे शुक्रवारी (ता. 3) रात्री 11 वाजता घडली.
मंजूषा पुन्नू उईके (24 रा. टोंगलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे, तर पुन्नू शंकरराव उईके (26, रा. टोंगलापूर) असे संशयित मारेकरी पतीचे नाव आहे. चांदूर बाजार पोलिसांनी संशयित पतीला घटनेनंतर काही तासातच अटक केली.
दीड वर्षांपूर्वी झाला होता विवाह
उईके कुटुंबीय मुळचे मध्यप्रदेशातील आहे. मात्र पुन्नूचे आई वडील मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील शिरजगाव बंड येथे राहतात. त्यामुळे पुन्नुसुध्दा शिरजगावात राहत होता. दरम्यान दीड वर्षापीर्वी पुन्नूचा मंजूषासोबत विवाह झाला. लग्नानंतर पुन्नू व मंजूषासुध्दा शिरजगाव बंड येथेच राहत होते. पुन्नू हा गवंडी काम करतो. दरम्यान 15 दिवसांपूर्वी शिरजगाव बंडवरुन पुन्नू, त्याची पत्नी मंजूषा व 8 महिन्यांचा मुलगा हे टोंगलापूरला राहायला गेले. पुन्नू आणि मंजूषा या दाम्पत्यांमध्ये नेहमीच घरगुती कारणावरुन वाद व्हायचे.
त्या रात्रीही झाला होता वाद!
शुक्रवारी रात्रीसुध्दा पती-पत्नीत वाद झाला. याच वादातून पुन्नूने मंजूषाला मारहाण केली, तसेच तिच्या गळ्यावर लाथ मारुन तिला जिवानिशी ठार केले. ही माहिती पुन्नूच्या शेजारी राहणाऱ्या संजू धुर्वे यांनी गावच्या पोलिस पाटील शुभांगी मानकर यांना दिली. तातडीने त्यांनी चांदूर बाजार पोलिसांना माहीती दिली. तसेच पोलिस व ग्रामस्थांनी मंजूषाला चांदूरच्या शासकीय रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा
या प्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी पोलिस पाटील मानकर यांच्या तक्रारीवरुन पुन्नूविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला. दरम्यान शनिवारी (दि. ४) पहाटे पोलिसांनी पुन्नू उईला अटक केली आहे. ही कारवाई चांदूर बाजारचे ठाणेदार सुनील किनगे, एपीआय दीपक राऊत, पीएसआय गावंडे, एएसआय विनोद इंगळे, अजय पाथरे, निकेश नशीबकर, भूषण पेठे, पंकज येवले, विक्की दुर्णे, अमोल टेकाडे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.