आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकडाने घेतला चावा:पिसाळलेल्या माकडाने घेतला दोघांना चावा; अमरावती व दर्यापूर येथील वन विभागाच्या बचाव पथकाने या माकडाला सोमवारी जेरबंद केले

दर्यापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला लागून व ग्रामपंचायत गायवाडी अतर्गतच्या साईनगर परिसरात पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घालत परिसरातील दोन युवकांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना रविवारी घडली. दरम्यान अमरावती व दर्यापूर येथील वन विभागाच्या बचाव पथकाने या माकडाला सोमवारी जेरबंद केले.

सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने माकडांनी शहराकडे धाव घेतली आहे. रविवारी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या आशिष जवंजाळ (३१) व भूषण खंडारे (२४) या दोन युवकांना या माकडाने पाठीमागून येत चावा घेत त्यांना जखमी केले. घटनेचे गांभीर्य पाहून सरपंच देवता वानखडे, विलास साखरे, मारोती यलोणे, गणेश पवार, विनोद वानखडे आदींनी वन अधिकारी एन. बी. सोळंके यांना पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी लेखी निवेदन दिले होते. दरम्यान वनपरिक्षेत्र विभाग परतवाडा यांच्या मार्गदर्शनात सोमवारी दुपारी अमरावती येथील ७ जणांचे रेस्क्यू पथक साई नगरात दाखल झाले होते.

पशुधन विकास अधिकारी पल्लवी पुनसे यांच्या उपस्थितीत माकडाला जेरबंद करत दर्यापूरचे वनपाल ज्ञानेश्वर सोळंके यांच्याकडे सोपवले. ही कारवाई बचाव पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नवरे यांच्या मार्गदर्शनात दर्यापूरचे वनपाल ज्ञानेश्वर सोळंके, अमोल गावनेर, जगन पालिसाड, सतीश उमक, मनोज ठाकूर, सूरज भांबुरकर, वैभव राऊत यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...