आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धनेगावातील शेतमजुराचा मुलगा झाला पीएसआय; जिद्द व चिकाटीतून मिळवले यश; कष्टकरी आई वडिलांचे स्वप्न केले पूर्ण

अंजनगाव सुर्जी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेणेही दुरापास्त झालेले असताना एका गरीब मजुराच्या होतकरू मुलाने स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले असून, तो पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. उराशी ध्येय बाळगून केलेल्या कठोर परिश्रमाला निश्चितच यश मिळते, हे त्याने या यशातून दाखवून दिले आहे. सागर देविदास किटे असे या जिद्दी तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील धनेगाव येथील शेतमजुरी करणारे देविदास किटे यांचा मुलगा सागर देविदास किटे याने जिद्द व मेहनतीच्या बळावर अहोरात्र अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न साकार केले आहे. याबद्दल संपुर्ण तालूक्यात त्याचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे सागरचे प्राथमिक शिक्षण हे जि.प. शाळेतून झाले आहे.

आजकाल नोकरी लागणे हे अंत्यत कठीण काम झाले असून, त्यातही वरिष्ठ स्तरावरच्या नोकरीसाठी वशिलाच लागतो, असा भ्रम निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत जावून मध्येच शिक्षण सोडून देत असल्याचे पहायला मिळत असताना, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील झोपडीत राहून परिश्रम व जिद्दीच्या बळावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झालेल्या सागर किटे याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आईवडील शेतमजुरीचे काम करतात. एक मुलगी व दोन मुले, असा एकूण पाच जणांचा संसाराचा गाडा चालवून मुलीला बारावीपर्यंत शिक्षण देत तिचे थाटात लग्न केले. दोन मुलांपैकी एक मोठा मुलगा सागर शिक्षणात हुशार असल्याने चांगला अभ्यास करून अधिकारी व्हावा, असे स्वप्न उराशी बाळगलेल्या आई वडिलांची इच्छा अखेर सागरने आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण केली.

सागर यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण धनेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर टाकरखेडा मोरे समाज प्रबोधन विद्यालयात त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. तालुक्याच्या ठिकाणी राधाबाई सारडा महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्याने २०१९ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली होती.

बातम्या आणखी आहेत...