आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेस पात्र:शहरातील 23 केंद्रांवर होणार रविवारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी विविध पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील २३ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ६ हजार ७५८ उमेदवार परीक्षेस पात्र ठरले आहे. दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षा केंद्रांवर ७०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. राज्य सेवा आयोगाची २०२२ साठीची पूर्व परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या अंतर्गत एकुण १६१ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २३ केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, वित्त आणि लेखा सेवा गट अ सहाय्यक संचालक, नगरपालिका- नगर परिषद मुख्याधिकारी गट ‘अ’, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट ‘ब’ या आणि बालविकास विभागाच्या पदांसाठी ही पूर्वपरीक्षा होणार आहे

बातम्या आणखी आहेत...