आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात जिल्ह्यातील सात पंचायत समितीमधील विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार दाखवत विविध समूह नृत्य, नाटिका, एकल नृत्य, गीत, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीत अशा अनेक विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करत उपस्थितांना जागीच खिळवून ठेवत दाद मिळवली. या वेळी मोठ्या संख्येने अमरावतीकर प्रेक्षकांनी उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या परीक्षक म्हणून नाट्य कलावंत ज्ञानदा पाटिल-येवतीकर, रंगभूमी परीक्षक प्रतिभा टेटू, नाट्यकर्मी माया वाकोडे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजक गजानन देशमुख, सुरेश चिमणकर, सुनीता लहाने, शिला मसराम, क्रीडा संयोजक डॉ. नितीन उंडे, उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख उपस्थित होत्या.
या सां स्कृतिक महोत्सवामध्ये काटी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ हे समुह नृत्य, नांदगाव खंडेयवर पंचायत समितीमधील दाभा शाळेने शेतकरी व्यथा विविध प्रकारे सादर केले, चांदूर रेल्वे पं. स. मधील चिरोडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंजारा नृत्य, गणेश वंदन आणि गोंडी नृत्य, तर सादर केले, चांदूरवाडी शाळेने देशभक्ती गीत व एकल नृत्य सादर केले.तर अमरावती पं. स. मधील नांदगाव पेठ कन्या शाळेने मोबाईलचा वापर टाळा, शारीरिक खेळ खेण्याचा संदेश नाटिकेतून दिला. दर्यापूर पं. स. मधील माहुली धांडे येथील विद्यार्थ्यांनी ‘जिस देश मे गंगा रहता है’ हे समुह नृत्य सादर केले, गोडेगाव येथील संस्कृती चोरपगार हिने ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. तिवसा तालुक्यातील वऱ्हा शाळेने नृत्यातून देवी वंदना केली. धामणगाव रेल्वे तालुक्यातील दिघी महल्ले शाळेने अतिशय उत्कृष्ट आदिवासी लोकनृत्य सादर केले. तसेच तुकडोजी महाराजांचे भजन आणि एकल नृत्य सादर केले.
अंजनगाव सुर्जी मधील विहीगाव शाळेने सुधीर खोडे यांनी तयार केलेले ‘चला शिकू सारे, शब्दांच्या जाती रे हे’ शिक्षणावर आधारित नृत्य,‘भयमुक्त शिक्षण करील बालकाचे रक्षण’ नाटिकेचे सादरीकरण केले. मोर्शी पं. स. मधील नेरपिंगळाई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी वाघ्या मुरळी हे पारंपरिक लोकनृत्य, तर अनुश्री सुरजुसे हिने ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला, तसेच जि. प. शाळा उमरखेड यांनी समूह नृत्य सादर केले. अमरावती पंचायत समिती मधील जि. प. कन्या शाळा नांदगाव पेठ यांनी मुलींचे सक्षमिकरण, माहोली जहांगीर यांनी विविधतेतून एकता (वंदे मातरम), डवरगाव शाळेने विष्णू अवतार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.