आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला शासनाने पुन्हा तीन दिवसांची मुदत देण्यात आली. त्यामुळे ६ जूनपर्यंत प्रवेश करता येणार आहे. दुसऱ्या दुसऱ्या टप्यातील आतापर्यंत १८४७ प्रवेश निश्चित झाल्याने अद्यापही ३६६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे ६ जूनपर्यंत या जागांवर प्रवेश निश्चित न झाल्यास ९ जूनपासून प्रवेशाचा तिसरा टप्पा राबवला जाणार आहे.
आरटीईच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेशाची प्रक्रिया आटोपल्यानंतर शिक्षण विभागाने दुसऱ्या टप्प्यातील प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील प्रवेशाचा आकडा १ हजार ८४७ वर पोहोचला आहे. आरटीईअंतर्गत २४० शाळांमध्ये २२५५ प्रवेश हे राखीव करण्यात आले होते. या राखीव जागेवर २२१३ पाल्यांची लॉटरी लागल्याने त्यांच्याकरता शिक्षण विभागाने ६ एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरूवात केली होती. दरम्यान १० मेपर्यंत पहिल्या टप्प्यातील १५०४ पाल्याचे प्रवेश स्वीकारण्यात आले. यानंतर शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली. यातील उर्वरित ७०९ रिक्त जागांकरिता पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या पाल्यांना प्रवेश देण्यात येत असून, १९ मेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. याकरिता २७ मे ही डेडलाइन देण्यात आली होती.
यादरम्यान दुसऱ्या टप्प्यातील १८० पाल्यांचे प्रवेश करण्यात आले आहे. परंतु अद्यापही प्रवेश शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रवेशासाठी सलग दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ३ जून शेवटची तारीख असताना यामध्ये ६ जूनपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत १८४७ प्रवेश निश्चित झाल्याने अद्यापही ३६६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे ६ जूनपर्यंत यातील प्रवेश स्वीकारून ८ जूनपर्यंत याचा अहवाल शासनाकडे सादर करावयाचा आहे. यातून जागा रिक्त राहिल्यास ९ जूननंतर तिसरा टप्पा राबवल्या जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.