आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्यास बांधकाम कामावरील मिक्सर घेऊन जात असलेल्या ट्रकने चिरडले. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. ४) दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील नवाथे चौक परिसरात घडला.
श्याम राधेश्याम यादव (३८) रा. वसंतराव नाईकनगर, अमरावती असे मृताचे नाव आहे. श्याम हे सोमवारी दुपारी नवाथे चौक परिसरातील एका दुचाकी शोरूमसमोरून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी मिक्सर घेऊन जात असलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक देवून चिरडले. हा ट्रक श्याम यांच्या कमरेवरुन गेला. या अपघातात श्याम यादव यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व श्याम यादव यांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
दुकानातून साहित्य घेऊन जाताना गमावला जीव
श्याम यांची शहरातील रायली प्लॉट - जयस्तंभ चौक परिसरात चहा कँटीन व पानटपरी होती. दुपारी घरुन ते किराणा दुकानातून पानटपरीसाठी लागणारे काही साहित्य घेण्यासाठीच बाहेर पडले होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असतानाच मिक्सर घेऊन जाणारा ट्रक त्यांचा काळ बनून आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.