आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मुलगी पाहण्यासाठी जाणाऱ्यांच्या कारला ट्रकची धडक; कुटुंबातील दोघांसह 5 ठार, अमरावतीजवळ वीस किमीच्या अंतरावर दुसऱ्या अपघातातही 2 जण ठार

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्ह्यात रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सात जण ठार झाले, तर सहा जखमी झाले. हे दोन्ही अपघात वीस किलोमीटर अंतरावर झाले. मुलगी पाहण्यासाठी जाणाऱ्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले यात एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश आहे, तर दुसऱ्या अपघातात दोन ठार झाले.

मृतात तवेरा चालक रोशन रमेशराव आखरे (२६), प्रतिभा सुभाषराव पोकळे (५०), विजय भाऊरावजी पोकळे (५५ तिघेही रा. अंजनगाव बारी) कृष्णा सचिन गाडगे (८, रा. शिरजगाव कसबा) आणि गजानन संतोषराव दारोकर (४५, रा. जरुड) अशी मृतांची नाव आहेत.

अंजनगाव बारी येथील अनिकेत सुरेशराव पोकळे याच्यासाठी शिरजगाव कसबा येथे मुलगी पाहण्याचा रविवारी कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अंजनगाव बारी येथून पोकळे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक दोन चारचाकी वाहनांनी शिरजगाव कसब्याकडे निघाले होते. प्रवाशांना घेऊन रोशन तवेराने शहराबाहेरून जाणाऱ्या रहाटगाव रिंग रोडवरून जात होते. त्याचवेळी हॉटेल कंदील समोर तवेरा आणि विरुद्ध दिशेने येणारा भरधाव मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या तवेराचा अक्षरश: चुराडा झाला. यात पाच जण ठार झाले. अपघातानंतर ट्रक पथदिव्याच्या खांबावर धडकला.

झोपेची डुलकी आली अन् ट्रकवर वाहन धडकले; दोघांचा मृत्यू
दुसरा अपघात सावर्डी पुलावर झाला. नागपूरहून अमरावती व अकोट येथे दूध घेऊन निघालेल्या मालवाहू वाहनाच्या चालकाला डुलकी आली व भरधाव वाहन समोर असलेल्या धावत्या ट्रकवर जाऊन धडकले. या यात राजू बाबूराव किरनाके (५२) व सागर श्यामराव बाहे (२८, दोघेही रा. नागपूर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...