आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • The Two Daughters Gave Fire To The Father's Cheetah; Anjangaon Is Reviving The Discussion Of The Funeral That Breaks The Tradition |marathi News

दिव्य मराठी विशेष:दोन मुलींनी दिला पित्याच्या चितेस भडाग्नी; परंपरांना फाटा देणाऱ्या अंत्यसंस्काराची अंजनगाव सुर्जीत होतेय चर्चा

अंजनगाव सुर्जीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंजनगांव सुर्जी येथील अरुण तुळशीराम टांक यांचे ६ जून रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. मंगळवारी, ७ रोजी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. हा अंतिम संस्कार सर्व रितीरीवाजांना फाटा देणारा ठरला. स्व. अरुण टाक यांच्या दोन्ही मुलीं प्रिया आणि वैशाली यांनी पित्याच्या तिरडीला खांदा दिल्यानंतर त्यांच्या चितेस भडाग्नीही दिला.

अंजनगांव सुर्जी शहरातील टाक हे एक उच्चशिक्षीत आणि नामांकित कुटुंब असून बदल स्वीकारण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. पुरोगामी विचारांची छाप या कुटुंबावर पूर्वीपासूनच आहे. याच कुटुंबातील स्व. अरुण टाक हे महावितरण कंपनीत काम करत असताना १६ वर्षांआधी एका अपघातात जखमी होऊन अपंग झाले होते. अरुण टाक यांना दोन मुलीच असून त्यांची मोठी मुलगी प्रिया सचिन अब्रुक नगर परिषद अंजनगाव सुर्जी येथे कार्यरत आहे. तर लहान मुलगी वैशाली मंगेश चौधरी महावितरणमध्ये कार्यरत आहे. दोन्ही मुलींसह जावयांनी अरुण टाक यांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली.

६ जून रोजी अरुण टाक यांनी शेवटचा श्वास घेतला. परंतु, मृत्यूनंतर होणारे सोपस्कार हा मुलगाच करू शकतो. ही खंत मनात न ठेवता दोन्ही मुली आणि जावयांनी स्व. अरुण टांक यांना खांदा दिला. तसेच स्मशानभूमीत जाऊन दोन्ही मुलींनी हिंदू रितीरिवाजानुसार सर्व सोपस्कार पूर्ण केले.

पित्याला भडाग्नी देऊन मुलाची कमतरता या मुलींनी शेवटच्या क्षणालाही भासू दिली नाही. स्मशानभूमीत शेकडो नातेवाइकांनी हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी बघितला. त्यानंतर दोन्ही मुलींचे कौतुकही केले. बुरसटलेल्या परंपरा सोडायला हिंमत लागते. प्रिया आणि वैशाली या दोन्ही मुलींनी पुढे होत अंतिम संस्काराचे सोपस्कार पूर्ण करतो, असे घरातील वडिलधारे राजेंद्र टाक यांना सांगितले. त्यांनी तसेच इतरांनीही संमतीसह हिंमत दिली हे विशेष. परंपरांना आणि रितीरिवाजाला फाटा देत आणि पुरोगामी विचारांची वाट धरत करण्यात आलेल्या या अंत्यसंस्काराची तालुक्यात चर्चा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...