आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदगाव पेठ पोलिसांनी एका वाहन चोरट्याला देशमुख लॉन परिसरातून अटक केली. कुणाल साहेबराव वानखडे (२०, रा. केवल कॉलनी) असे त्याचे नाव आहे. त्याने दुचाकीसह सायकल चोरी अशा एकूण चार गुन्ह्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी व दोन सायकली जप्त केल्या आहेत. नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात ३१ जानेवारीला दुचाकी चोरीचा एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्ह्यात विशाल लिलाटकर (३०, रा. रामनगर, गिरजा विहार, देशमुख लॉन मागे, अमरावती) यांची दुचाकी चोरी गेली होती. या गुन्ह्याच्या तपासात ४ मार्चला एपीआय दत्ता देसाई यांनी संशयाच्या आधारे कुणाल वानखडेला ताब्यात घेवुन विचारपूस केली. त्यावेळी त्याने राम नगर परिसरातून एक काळ्या रंगाची दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.
या माहितीवरून पोलिसांनी त्याला अटक केली होती. चौकशीनंतर त्याने नांदगावपेठ, राजापेठ व गाडगेनगर हद्दीतून दुचाकी व सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दोन दुचाकी व दोन सायकली जप्त केल्या. नांदगाव पेठ पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई नांदगावचे ठाणेदार प्रविण काळे, एपीआय दत्ता देसाई, खारोळे, राजू काळे, सुभाष पोहणकर, पंकज यादव, सतीश महल्ले, ललित देवकर व वैभव सवईकर यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.