आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवंश वाहतूक:वाहनावर आरटीओने ठोठावला दंड ; वरुड सीमा तपासणी नाक्यावर केली कारवाई

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या एका मालवाहू वाहनाला आरटीओच्या पथकाने वरुड सीमा तपासणी नाक्यावर थांबण्याचा इशारा केला. मात्र तो वाहन चालक भरधाव पळाला. आरटीओ पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या वाहनात गुरे असल्याचे लक्षात येताच पथकाने त्या वाहनचालकाला ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई रविवारी सायंकाळी केली.

वरुड येथील सीमा तपासणी नाक्यावर रविवारी दुपारी मोटर वाहन निरीक्षक हितेश दावडा हे पथकासह कार्यरत होते. त्याचदरम्यान मध्य प्रदेशातून एक मालवाहू बोलेरो वाहन (क्रमांक एमपी ०८ जीए २८५८) महाराष्ट्राच्या सीमेत आले. या वेळी आरटीओ पथकाने वाहन चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पळाला. त्यामुळे आरटीओ पथकाने वाहनाचा पाठलाग करून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर त्याला पकडले. या वेळी वाहन चालक देवेंद्र कुशवाहा या वाहनात काय आहे, ते सांगायला तयार नव्हता. पथकाने पाहणी केली असता वाहनात गोवंश दिसले. त्यानंतर आरटीओ पथकाने सदर वाहनावर मोटर वाहन कायदा १९८९ नुसार ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला तसेच पुढील कारवाईसाठी वाहन चालक, गोवंश व वाहन शेंदूरजना घाट पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून अनेकदा कारवाई होते. मात्र आरटीओकडून झालेली ही अलीकडच्या काळातील पहिलीच कारवाई आहे.

बातम्या आणखी आहेत...