आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी पंडांकडून सीमांकन घोषित:प्रतीक्षा संपली! अमरावतीत आता जिल्हा परिषदेचे 7 मतदारसंघ, प्रशासनाकडून शिक्कामोर्तब

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेतील बहुप्रतिक्षीत वाढीव मतदारसंघांचा गुलदस्ता आज जिल्हा प्रशासनातर्फे उघडण्यात आला. अमरावतीत आता जिल्हा परिषदेचे 7 मतदारसंघ प्रशासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून आता एकूण मतदारसंघांची संख्या 66 वर पोहचली आहे.

चांदूरबाजार, वरुड, धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली व अचलपूर या सात तालुक्यांमध्ये सदर वाढीव सात मतदारसंघांना जागा मिळाली आहे. या वाढीव मतदारसंघांमुळे जिल्ह्यातील एकूण मतदारसंघांची संख्या 66 वर पोहोचली असून प्रत्येक मतदारसंघातील गावांची यादीही जाहीर झाली आहे.

दरम्यान मतदारसंघांची संपूर्ण रचना घोषित झाल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले असून प्रत्येक राजकीय पक्ष त्यादृष्टीने कामाला लागला आहे. राजकारण्यांच्या या तयारीचे तपशिल ‘दिव्य मराठी’ने गेल्या आठवड्यातच नागरिकांपुढे मांडले होते. दरम्यान आज घोषित झालेल्या प्रारूपावर आगामी 8 जूनपर्यंत सूचना व हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर 22 जूनपर्यंत विभागीय आयुक्तांच्या दालनात प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकूण घेतले जाणार असून 27 जून रोजी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची अंतीम यादी घोषित केली जाईल.

प्राप्त तपशिलानुसार चांदूरबाजार तालुक्यात सोनोरी, वरुड तालुक्यात शहापूर, धारणीत घुटी, दर्यापूरमध्ये माहुली धांडे, अंजनगाव सुर्जी तालुक्यात खानमपूर पांढरी, भातकुलीत निंभा तर अचलपूर तालुक्यात गौरखेडा कुंभी हा नवा मतदारसंघ तयार झाला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी गेल्या 23 मे रोजीच या निवडणुकीचे प्रारुप येथील विभागीय आयुक्तांना सादर केले होते. त्यांनी पडताळणी करुन 31 मे रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे ते परत पाठविले.

आज प्रभारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रारुपाची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर जिल्ह्याचा एकूण भूभाग यावर्षी पहिल्यांदाच 66 मतदारसंघांमध्ये विभाजीत करण्यात आला आहे.

सात मतदारसंघ वाढले

अमरावतीचे प्रभारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा म्हणाले, उपलब्ध आकडेवारीनुसार निम्म्या जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या सरासरी 30 हजार झाली आहे. ती 25 हजारावर आणण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा बदल सूचविला आहे. त्यामुळे सात तालुक्यात प्रत्येकी एक असे सात नवे मतदारसंघ निर्माण झाले असून जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाची सरासरी लोकसंख्या 25 हजार झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...