आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती संकेतस्थळावर:विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला‎ 13 मार्चपासून होणार सुरूवात‎ ; लेखी परीक्षांच्या पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर‎

अमरावती‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे‎ घेण्यात येणाऱ्या हिवाळी-२०२२ लेखी‎ परीक्षांच्या पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक‎ जाहीर झाले असून सोमवारपासून (दि.‎ १३) या परीक्षा घेण्यात येणार आहेत.‎ यासंदर्भात सर्व संबंधित महाविद्यालयांचे‎ प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित‎ महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांनाही पत्राद्वारे‎ कळवण्यात आलेले असून संबंधित‎ विद्यार्थ्यांनी याबाबत नोंद घ्यावी, असे‎ आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले‎ आहे.‎ क्रीडा, सांस्कृतिक अविष्कार, आव्हान,‎ उत्कर्ष आदी स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या‎ विद्यार्थ्यांच्या विद्यापीठीय पर्यायी परीक्षा‎ जाहीर वेळापत्रकानुसार १३ मार्चपासून‎ संबंधित परीक्षा केंद्रांवर घेण्यात येतील.‎

त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील‎ विद्यार्थ्यांची परीक्षा श्री शिवाजी विज्ञान‎ महाविद्यालय (अमरावती) या परीक्षा‎ केंद्रावर होईल, तर अकोला जिल्ह्यातील‎ विद्यार्थ्यांची परीक्षा श्रीमती लक्ष्मीबाई‎ राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य‎ महाविद्यालय (अकोला) या परीक्षा‎ केंद्रावर, मलकापूर शहरातील विद्यार्थ्यांची‎ परीक्षा जनता महाविद्यालय (मलकापूर,‎ जि. बुलडाणा), यवतमाळ जिल्ह्यातील‎ विद्यार्थ्यांची परीक्षा अमोलकचंद‎ महाविद्यालय (यवतमाळ) या परीक्षा‎ केंद्रावर, वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची‎ परीक्षा आर. ए. महाविद्यालय (वाशिम)‎ या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.‎

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरिता‎ विद्यार्थ्यांच्या हिवाळी-२०२२ परीक्षेच्या‎ प्रवेश पत्रावर नमूद असलेले केंद्र, परीक्षा‎ केंद्र म्हणून राहतील. विद्यार्थ्यांना हिवाळी‎ परीक्षेकरिता देण्यात आलेले परीक्षा‎ क्रमांक व प्रवेशपत्र पर्यायी परीक्षेकरिता‎ कायम राहतील, तसेच वेळापत्रक व‎ परीक्षा केंद्रनिहाय रोल लिस्ट‎ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध‎ करून देण्यात आलेले आहे. सर्व संबंधित‎ विद्यार्थी, महाविद्यालयांचे प्राचार्य,‎ केंद्राधिकारी, परीक्षा केंद्र यांनी याची नोंद‎ घ्यावी, अधिक माहिती हवी असल्यास‎ परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी‎ संचालक मोनाली तोटे पाटील यांच्याशी‎ संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्या‎ वतीने कळवण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...