आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:महिला आरोपींनी काखेतील बाळाला कोर्टातच चिमटे काढून रडवले, सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवासादरम्यान सहप्रवाशांचे दागिने व रोख चोरणाऱ्या अट्टल महिला चोरणींची टोळी गाडगेनगर पोलिसांनी पकडली आहे. याच तीन महिला आरोपींना पोलिसांनी शनिवारी (दि. 4) येथील न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाचे कामकाज सुरू असताना तीन महिलांपैकी दोघींनी त्यांच्या काखेत असलेल्या बालकांना चिमटे काढून रडवले. या प्रकारामुळे कोर्टासह उपस्थितांचे लक्ष विचलीत झाले. या विचीत्र प्रकाराने गाडगेनगर पोलिसांनी या तिन्ही महिलांविरुध्द शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

गाडगेनगर पोलिसांनी अटक केलेल्या या तिन्ही महिलांना शनिवारी दुपारी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (क्रमांक10) यांच्या न्यायालयात पोलिस कोठडीची मागणी करण्यासाठी हजर केले होते. कोर्टाचे कामकाज सुरू होताच एका महिलेने तीच्या काखेत असलेल्या एक वर्षाच्या बालकाला जोरात चिमटा काढला. त्यामुळे न्यायालयाने त्या महिलेला मुलासह बाहेर घेवून जाण्यास सांगितले. त्यानंतर कामकाज सुरू झाले. काही वेळातच दुसऱ्या महिलेने तीच्या काखेत असलेल्या दिड वर्षाच्या मुलाला जोरात चिमटा काढला. चिमटा काढल्यामुळे ते बाळसुध्दा रडायला लागले.

हा संपुर्ण प्रकार घडला त्यावेळी सरकारी वकीलांसह कोर्ट पैरवी अधिकारी व उपस्थित ईतरांचे लक्ष होते. बालकांना रडवून कोर्टासह सर्वांचे लक्ष विचलीत करण्याचा हा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर या तिन्ही महीलांना पुन्हा कोर्टात हजर केले असता त्या महिला रडायला लागल्या. या तिन्ही महिलांच्या कृत्यामुळे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण झाला. तसेच दोन महिलांनी चिमुकल्यांना चिमटे काढून कृरतेची वागणूक दिली. त्यामुळे गाडगेनगरचे पीएसआय सचिन माकोडे यांनी या तिन्ही महिलांविरुध्द गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी या तिन्ही महिलांविरुध्द शासकिय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे तसेच 75 बाल न्याय अधिनियमाव्दारे गुन्हा दाखल केला आहे.

चोरीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी मिळाली

पाच दिवसांपुर्वी या तिन्ही महिलांना अटक केली आहे. शनिवारी त्यांना कोर्टात हजर केले असता दोघींनी त्यांच्याजवळ असलेल्या बालकांना चिमटे काढून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. त्यांना चोरीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी मिळाली आहे, असे गाडगेनगर प्रभारी ठाणेदार प्रविण वांगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...