आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू खुपसला:तरुणाच्या पोटात चाकू खुपसला; पाते अडकले, मूठ राहिली बाहेर

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन तरुणांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यावेळी एकाने दुसऱ्याच्या पोटात चाकू खुपसला. मात्र चाकू पोटातून बाहेर काढताना पाते पोटात अडकले आणि मूठ बाहेर आली. अखेर त्या ३० वर्षीय युवकाला चाकूच्या पात्यासह तत्काळ इर्विनमध्ये दाखल केले. तातडीने शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी पोटात फसलेले चाकूचे पाते बाहेर काढले. ही घटना शहरातील आझादनगर भागात सोमवारी दुपारी घडली आहे.

सै. इरशाद सै. कदीर (३०, आझादनगर) असे जखमी तरुणाचे नाव असून, नितेश रमेश अडोकार (२४, रा. झाडपीपुरा, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. सोमवारी दुपारी ३ वाजता या दोघांमध्ये वाद झाला. वाद झाला त्यावेळी नितेशने धारदार चाकू सै. इरशादच्या पोटात खुपसला. यावेळी चाकू बाहेर काढताना मूठ नितेशच्या हातात आली, तर चाकूचे साडेतीन इंच लांबीचे पाते पोटात अडकले. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत इर्विनमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून पाते बाहेर काढले. तसेच पुढील उपचारासाठी सै. इरशादला नागपूरला रवाना केले असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नितेश अडोकारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ कोणत्या ठाण्याच्या हद्दीत आहे हे स्पष्ट नव्हते, त्यामुळे नागपुरी गेटचे पीआय विवेक राऊत व गाडगे नगरचे अधिकारी आपापल्या पथकासह इर्विनमध्ये दाखल झाले होते. तसेच एसीपी पूनम पाटीलसुद्धा इर्विनला आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...