आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अत्याचारातून तरुणी राहिली गर्भवती; तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका २२ वर्षीय तरुणाने २० वर्षीय तरुणीसोबत ओळखीतून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीवर अत्याचार केला. यातून तरुणीला तीन महिन्यांची गर्भधारणा झाली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या बयाणा वरुन गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि. १०) उशिरा रात्री अत्याचार करणाऱ्या मेळ घाटातील गिट्टा गावातील २२ वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सुरज प्रेमलाल धुर्वे (२२, रा. गिट्टा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी व सूरज यांची काही महिन्यांपूर्वी एका महिलेने ओळख करुन दिली. ओळख झाल्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत मोबाइलवरुन संभाषण सुरू झाले. त्यांच्यात मैत्री व नंतर प्रेमसूत जुळले. त्यानंतर सुरजने पीडीत तरुणीला भेटण्यासाठी बोलावून वारंवार लैंगिक अत्याचार केला. यातूनच पीडितेला तीन महिन्यांची गर्भधारणा झाली. दरम्यान, पीडितेला प्रकृती अस्वास्थामुळे १० जूनला येथील डफरीन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी गाडगेनगर पोलिसांना रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी जाऊन पीडीत तरुणीचे बयाण नोंदवले. त्यावेळी सुरज धुर्वेने हे कृत्य केल्याचे पीडितेने सांगितले. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी सुरज धुर्वेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनास्थळ हे धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे हा गुन्हा शनिवारी (दि. ११) धारणी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

बातम्या आणखी आहेत...