आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाचा खून:बाईचा नाद सोड’...म्हटले म्हणून संतापात धाकट्याने केला थोरल्या भावाचा खून

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुला पत्नी आणि चार मुले आहेत, घरात वृद्ध आई-वडील आहेत. त्यांनी किती दिवस तुझ्या पत्नी-मुलांचा सांभाळ करायचा. तू त्या बाईचा नाद सोड… असे म्हटल्याचा राग आला म्हणून धाकट्या भावाने थोरल्याला भोसकून थोरल्याचा भोसकून खून केला. ही थरारक घटना गुरुवारी पहाटे धारणी पोलिस ठाण्यांतर्गत हरिसालच्या पैलढाणा येथे घडली.

आरोपीचे नाव सुनील शिवनाथ चव्हाण (वय ३०) असून, तो संत्रा वाहून नेण्याचे (ढुलाईचे) मजुरी काम करत होता. तर खून झालेल्या थोरल्या भावाचे नाव अनिल शिवनाथ चव्हाण (वय ३२) आहे. हे कुटुंबीय हरिसालच्या पैलढाणा येथे राहते.

सुनील हा विवाहित असून, त्याला चार अपत्ये आहेत. जांबू येथील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे माहीत झाल्यामुळे पत्नी आणि कुटुंबीयांसोबत त्याचे नेहमी खटके उडायचे. बुधवारी रात्री सुनील हा तिला भेटण्यासाठी गावी आला. यावेळी थोरला भाऊ अनिलने त्याचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. ‘तु त्या महिलेशी असलेले संबंध तोडून स्वत:च्या संसाराकडे लक्ष दे. घरात वृद्ध आई-वडील असल्यामुळे त्यांनी किती दिवस तुझ्या कुटुंबाला जपायचे’, असे अनिलचे म्हणणे होते. हा संवाद सुरु असतानाच सुनीलने धारदार चाकूने अनिलच्या छातीवर सपासप वार केले. हृदयावर गंभीर जखम झाल्यामुळे अनिलचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर सुनीलने तेथून पळ काढला. धारणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवबून त्याचा शोध सुरु केला आहे. ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विकास राठोड करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...