आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ वर्धा:युवकांनी उचलला स्वच्छतेचा विडा ; 3 मोहिमेत प्लास्टिक कचरा गोळा

वर्धा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक व्यक्ती मॉर्निंग वॉकला शरीर निरोगी राहावे यासाठी जातात, मात्र रस्त्याच्या दुतर्फा भागात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने, चालणे अवघड झाले आहे. शहर सुंदर व स्वच्छ दिसावे यासाठी वर्ध्यातील युवकांनी एक पाऊल पुढे टाकून प्लॉगर्स नावाचा समूह स्थापन करीत स्वच्छ शहर दिसावे याकरिता विडा उचलला आहे. दरम्यान, हनुमान मंदिर टेकडी पिंपरी वर्धा परिसरात राबवण्यात आलेल्या तीन मोहिमेत ५० ते ६० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.

मॉर्निंग वॉकला जाताना प्लास्टिक कचरा उचलून परिसर स्वच्छ करणे हा उपक्रम विविध देशांमध्ये सुरू आहे. या उपक्रमाला प्लॉगिंग (जॉगिंग विथ पिकिंग गारबेज) संबोधले जाते. वर्ध्याच्या भोवताल चारपदरी रस्ते तयार करण्यात आले असून, त्या रस्त्याच्या दुतर्फा भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी वृद्ध व अनेक व्यक्ती मॉर्निंग वॉकला जाताना अनेक ठिकाणी दुर्गंधी येत असल्याने, अनेकांनी रस्त्याने जाणे बंद केले आहे.

रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा उचलण्यासाठी वर्ध्यातील अनेक तरुणांनी वर्धा प्लॉगर्स नावाचा समूह स्थापन करून या उपक्रमाला सुरुवात केली आहे. नागपूर प्लॉगर्स आणि पुणे प्लॉगर्स या समूहाकडून वर्धा प्लॉगर्सला प्रेरणा मिळाली. रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय या उपक्रमाचे नेतृत्व करत आहे. वर्धा प्लॉगर्स प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स, ग्लास, सिगारेट बर्ड्स व अन्य ‘न’कुजणारा कचरा गोळा करून तो नगरपालिकेला हस्तांतरित करतात.

तीन आठवड्यांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम लोकप्रिय झाला असून अनेक जण स्वतःहून उपक्रमात सहभागी होत आहेत. स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणे हा देखील उपक्रमाचा उद्देश आहे. डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, तसेच इतर स्थानिक लोकांकडून प्रोत्साहन मिळाले. पुढील मोहिमेत वर्धावासीयांकडून सहभाग मिळेल ही आशा प्लॉगर्संनी व्यक्त केली आहे

बातम्या आणखी आहेत...