आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटक पाहतानाच ज्येष्ठ रंगकर्मीचा मृत्यू:अमरावतीचे नाट्यकलावंत राजाभाऊ मोरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ नाट्यकर्मी राजाभाऊ मोरे यांचा 5 डिसेंबरला जीवनगौरव पुरस्कारावेळी सत्कारावेळीचे छायाचित्र. - Divya Marathi
ज्येष्ठ नाट्यकर्मी राजाभाऊ मोरे यांचा 5 डिसेंबरला जीवनगौरव पुरस्कारावेळी सत्कारावेळीचे छायाचित्र.

बुधवारा येथील सुप्रसिद्ध आझाद हिंद मंडळाचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ नाट्यकर्मी राजाभाऊ मोरे यांचे आज, गुरुवारी रात्री 8 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. अमरावतीत राज्य नाट्य स्पर्धेत प्रयोग बघताना ही घटना घडली.

सध्या अमरावतीत राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज अनिल बर्वे लिखित थँक्यू मिस्टर ग्लाड' या नाटकाचा प्रयोग सुरू होता. हा प्रयोग बघत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आयोजकांसह तेथे उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ झेनिथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांची अंतयात्रा राहते घर बुधवारा, अंबागेट अमरावती येथून उद्या सकाळी 11 वाजता निघेल, असे कौटुंबिक सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या पश्चात 3 बहिणी, 2 भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे .

5 डिसेंबरला 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मान

राजाभाऊ हे अविवाहित होते. त्यांना नाट्य क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच डिसेंबरला त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हनुमान व्यायाम शाळेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी यांच्यासह नाट्यक्षेत्रातील कलाकारांनी तिव्र संवेदना व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...