आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हयात जुलै महिन्यात पाच दिवस अतिवृष्टी झाली. तसेच संततधार सुरूच होता. ठराविक अंतराने हा मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे पिकांची आंतरमशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना संधीच मिळाली नाही. जिल्ह्यात जवळपास २ लाख हेक्टरवरील पिकांना अतिपावसाचा फटका बसला असून, सुमारे ६ ते ७ हजार हेक्टरमध्ये पेरलेले पिके पूर्णत: नष्ट झाले असल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे गाळ साचलेल्या व पूर्णत: खरडून गेलेल्या ६ ते ७ हजार क्षेत्रात आता खरिपाचे पीक घेणे शक्य नाही. एकंदरीत जुलै महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अतिपावसामुळे सुमारे ४० ते ५० टक्के तुरीची झाो पिवळी पडून मरणासन्न झाली आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन यंदा मोठया प्रमाणात घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच उडीद व मुगाची सुद्धा वाढ खुंटली असल्यामुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पावसाने काही भागात उघडीप दिली आहे.
जिल्ह्याच्या १४८२ गावांतील शेतीला अतिपावसाचा फटका
जुलै महिन्यात ५ जुलैला झालेल्या अतिपावसाने २८२ गावांतील २७ हजार १७० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. याचवेळी ११४९ हेक्टर क्षेत्र खरडून गेले तर ३ हजार ७४५ हेक्टर क्षेत्रावर गाळ साचला होता. १० जुलैला ७४ गावातील ६६८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. १८ जुलैला झालेल्या पावसाने ८२६ गावातील जवळपास १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ४६३ हेक्टर क्षेत्र खरडून गेले. तसेच २४ जुलैच्या पावसामुळे ३०० गावातील ५८ हजार ९२१ गेटमधील पिकांचे नुकसान झाले असून, १७१० हेक्टर क्षेत्र खरडून गेले असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेत पडीक ठेवण्याची वेळ आली
सुरूवातीला पाऊस उशिरा आला. त्यामुळे पेरणी लांबली. ८ जूनला पेरणी केली, पेरणीनंतर २० ते २२ दिवस पाऊस आला नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी केल्यानंतर पावसाने उघडाच दिली नाही. त्यामुळे उगवण्यापूर्वी जमिनीत बी सडले आहे. आता तिसऱ्यांदा पेरणी करणे शक्य नाही, त्यामुळे खरिपात शेत पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. -राजेश वाटाणे, शेतकरी, आसेगाव.
पिकांची स्थिती खत, फवारणीने सुधारेल
गाळ साचलले व खरडून गेलेल्या क्षेत्रात आता खरिपाचे पीक घेणे शक्य नाही. गाळ साचलेले क्षेत्र रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरेल. अति पावसामुळे माघारलेल्या पिकांची परिस्थिती फवारणी, खतामुळे सुधारली जाईल. मात्र, उत्पादनात २५ ते ३० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. जे शेत अतिपावसाने तलावासारखा झाले होते, तेथील सोयाबीन, कपाशी सावरली जाईल मात्र तूर सडून जाते. कारण तुरीला पेरणीनंतर लगेच जास्त पाणी सहन होत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.