आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्र- शिल्पकला प्रदर्शन‎:जिल्ह्यात पुन्हा थंडी‎ वाढण्याची शक्यता‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील चार ते पाच दिवसांपासून‎ वातावरणात गारठा असतानाच जम्मू‎ काश्मीर, हिमाचल प्रदेशामधील‎ संभाव्य बर्फर्वृष्टी लक्षात घेता ९‎ तारखेपासून पुन्हा थंडीचे प्रमाण‎ वाढण्याची शक्यता असल्याची‎ माहिती श्री शिवाजी कृषी‎ महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड‎ यांनी दिली.‎ मकर संक्रांत होताच उन्हाचा जोर‎ वाढू लागतो.

मात्र या वर्षी फेब्रुवारी‎ महिला सुरू होऊनदेखील‎ अमरावतीकरांना थंडीचा सामना‎ करावा लागत अाहे. त्यातच पुन्हा ९‎ फेब्रुवारीपासून थंडी वाढण्याची‎ शक्यता असल्याचा अंदाज‎ वर्तवण्यात येत असल्याने‎ अमरावतीकरांना आतापासूनच‎ हुडहुडी भरली अाहे.‎ सद्यस्थितीत कमी दाबाचे क्षेत्र‎ कोमोरीन जवळ आहे. त्यातच एक‎ नवीन पश्चिमी चक्रवात रविवारी‎ (दि. ५) पश्चिम हिमालयावर‎ येणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत‎ विदर्भात किमान तापमानात विशेष‎ फरक पडणार नसला, तरी मात्र पुर्व‎ विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची‎ लाट राहील. सोमवारपासून (दि.‎ ६) पुढील तीन दिवस किमान‎ तापमानात थोडी वाढ होईल. मात्र‎ त्यानंतर उत्तर भारतात होणारी‎ संभाव्य बर्फर्वृष्टी लक्षात घेता थंडी‎ वाढण्याची शक्यता वर्तवण्यात‎ आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...