आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची शक्यता:शियर झोन अन् चक्राकार वाऱ्यांमुळे जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची शक्यता

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व, पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र (शियर झोन) व चक्राकार वाऱ्यांमुळे जिल्ह्यात पुन्हा सार्वत्रिक पावसाची शक्यता आहे.हवानामशास्त्रीय बदलामुळे जिल्ह्यात ७ व ८ ऑगस्ट रोजी सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रा. बंड यांनी दिली.

मान्सूनची ट्रफरेषा खाली सरकली असुन ती आता जैसलमेर, उदयपूर, भोपाळ, मंडला, रायपूर, भुवनेश्वर, मध्य पुर्व बंगालचा उपसागर अशी आहे. शियरझोन दक्षिण भारतावर असून ती पुढील चार पाच दिवसात उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर ४.५ किमी. उंचीवर चक्राकार वारे कायम आहेत तर ईशान्य राजस्थान वर १.५ ते ३ किमी. उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी ७ आगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात, आंध्र-ओरिसाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भासह जिल्ह्या हलक्या-मध्यम पावसाची शक्यता आहे, तर ७ व ८ ऑगस्ट रोजी सार्वत्रिक पावसाची शक्यता असल्याचे प्रा. बंड यांनी सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...