आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठोस आश्वासन नाही:मालमत्ता कर कमी करणे बाबत ठोस आश्वासन नाही

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेली १८ वर्षे मालमत्ता करात वाढ झाली नाही, तसेच मालमत्तांचे मूल्यांकनही झाले नाही. परंतु, यंदा मालमत्तांच्या मुल्यांकनासोबतच करात ४० टक्के वाढ करण्यात आली. याबाबत माजी पालकमंत्री आ. प्रवीण पोटे यांनी गुरुवार,दि. २२ रोजी बचत भवनात झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांना विचारणा केली असता त्यांनी नियमानुसार वाढ करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच यावर तरतुदीनुसार विचार करू असे सांगत कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.

एकदम ४० टक्के मालमत्ता करात वाढ व मूल्यांकनाची वाढ हे शहरवासीयांवर ओझे असून याचा विचार व्हायला हवा. हा निर्णय परस्पर घेण्यात आला. कोणाशीही चर्चा करण्यात आली नाही. याबाबत शासनाचे मार्गदर्शन मागायला हवे, अशी मागणी आ. पोटे यांच्यासह भाजप पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी केली. त्यावेळी आयुक्तांनी काय करता येईल ते बघणारे असे म्हणत वेळ मारून नेली. परंतु, कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. ते बघता उपस्थित माजी नगरसेवकांनी एकसुरात निषेध केला.

मालमत्ता करातील वाढ मागे घ्यावी : शहर काँग्रेस मनपाने मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली आहे. यासंदर्भात मागणीपत्र शहरवासीयांना पाठविण्यात आले आहे. याला आमचा विरोध आहे. हा निर्णय घेताना कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. तसेच यासंदर्भातील निर्णय व कागदपत्रे देण्याचे आश्वासनही पूर्ण केले नाही. चर्चा करूनच निर्णयाची अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा मनपा आयुक्तांना शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलींद चिमोटे यांनी निवेदनात दिला आहे. निवेदनाची दखल घेण्याची मागणी केली आहे.

मालमत्ता करात ४० टक्के वाढीला विरोध : शहर भाजप
मालमत्ता करात ४० टक्के वाढीला विरोध आहे. शहरातील कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारांना तसेच सभागृह अस्तित्वात नसताना एवढेच नव्हे तर शहरातील कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता हा निर्णय घेतला. जर हा निर्णय मागे घेण्यात आला नाही, तर आम्ही आंदोलन करू, मनपाच्या या निर्णयाचा शहर व जिल्हा भाजप निषेध करत असल्याची प्रतिक्रिया शहर भाजप अध्यक्ष किरण पातूरकर यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...