आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदर्भाचे नंदनवन म्हणजेच चिखलदरा. राज्यातील थंड हवेच्या मुख्य ठिकाणांमध्ये चिखलदऱ्याचा उल्लेख नक्कीच होतो. जिल्ह्याच्या इतर ठिकाणांच्या तुलनेत चिखलदऱ्यात नेहमीच तापमान काही प्रमाणात कमी राहते. असे असले तरी चिखलदऱ्यात नेमके तापमान किती, हे तूर्तास कोणालाही तंतोतंत सांगता येत नाही. त्याचे कारण म्हणजे चिखलदरा येथे तापमान मोजण्यासाठी शासकीय किंवा अशासकीय यंत्रणाच कार्यरत नाही. वास्तविकता जिल्ह्यातील मुख्य पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरात तापमानाची नोंद करण्याची सोय असणे आवश्यक आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाचेही या बाबीकडे दुर्लक्ष असल्याचे या प्रकारावरुन समोर येत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदऱ्यात थंडी किती आहे, चिखलदऱ्याचा पारा किती खाली आला आहे, याबाबत निश्चितच चिखलदरावासीयांना तसेच चिखलदऱ्याच्या बाहेर राहणाऱ्या नागरिकांना उत्सुकता राहते. विशेषत: हिवाळ्यात तर अधिकच उत्सुकता असते. मात्र, चिखलदऱ्यातील तापमानाची नोंद घेण्यासाठी शासकीय यंत्रणाच उपलब्ध नाही. तीन वर्षांपूर्वीपर्यंत चिखलदरा येथील सिपना कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात तापमापक यंत्र होते व तापमानाच्या नोंदी महाविद्यालयाकडे राहायच्या. मात्र, मागील तीन वर्षांपासून ते यंत्र सुद्धा बंद पडले आहेत. वास्तविकता थंड हवेचे ठिकाण म्हणून देशभरात ओळख असलेल्या, आपल्या जिल्ह्याचे मुख्य पर्यटन ठिकाणांवरील तापमानाची नोंद करणे, ही जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र जिल्हा प्रशासन या बाबत पूर्णत: अनभिज्ञ आहे.
यंत्र नाही
तीन वर्षांपासून आम्ही येथे कार्यरत आहोत, मात्र तापमान मोजण्यासाठी यंत्र नाही. पर्जन्यमान मोजण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा आहे.माया माने, तहसीलदार, चिखलदरा.
माहिती घेतो
चिखलदरा येथे तापमान मोजण्यासाठी यंत्रणा आहे किंवा नाही, याबाबत आम्ही माहिती घेवून कळवतो.
-डॉ. विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.़
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.